The NCP Ajit Pawar group and the NCP Sharad Pawar group have finally come together : राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अखेर अखेर एकत्र

The NCP Ajit Pawar group and the NCP Sharad Pawar group have finally come together.
The NCP Ajit Pawar group and the NCP Sharad Pawar group have finally come together.

The NCP Ajit Pawar group and the NCP Sharad Pawar group have finally come together :

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar faction) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar faction) अखेर अखेर एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसारच घड्याळासोबत  जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोमवारी स्पष्ट केले. हा निर्णय पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड शहरासाठीच असल्याचे सांगत संपूर्ण महाराष्ट्रासाठी  ही युती (Alliance) झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पिंपरी महापालिकेत  दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी रात्री उशिरा पिंपरीतील सभेत घोषित केले. मात्र, पुण्यासंदर्भातील त्यांची अधिकृत भूमिका सोमवारी सायंकाळपर्यंत झाली नव्हती. तथापि, पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादीची युती पक्की मानली जात आहे.

अधिक वाचा  कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे -सरसंघचालक डॉ. मोहन भागवत : वेद सेवकांचा सन्मान

‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या  ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर  बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढविणार आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हा निर्णय झाला आहे. दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हावर (Election Symbols) निवडणूक लढवणार आहेत. महापालिकेचे बजेट  हे स्वतंत्र असते. त्या माध्यमातून लोकांना सेवा द्यायची असते. त्यामुळेच तिथे योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे असते. त्यानुसार निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांशी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी चर्चा केली. अनेक कार्यकर्त्यांचे मत हे घड्याळासोबत जाण्याचेच होते. ही लढाई कार्यकर्त्यांची असल्याने त्यांचे ऐकूनच आम्ही दोन्ही पक्ष महापालिकांसाठी एकत्रित लढणार आहोत.’ ‘महापालिकेच्या निवडणुकीत बलाढ्या शक्ती सोबत विरोधात लढण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी समीकरणे आहेत. अर्ज भरण्याचा बुधवार शेवटचा दिवस आहे. उमेदवारांना एबी फॉर्म (AB Form) दिल्यानंतर जागावाटपाबाबत (Seat sharing) स्पष्टता दिसून येईल. त्याचा फार्म्युला  अद्याप ठरलेला नाही. माध्यमांमधून तो जाहीर करावा, असे कुठेही ठरलेले नाही,’ असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  पुण्यातील उद्योजकाचा बिहारमध्ये निर्घृण खून

शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी राष्ट्रवादी सोडण्याची नेमकी कारणे काय याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘त्याची वेगळी कारणे आहेत व फार मोठी कारणे आहेत. मात्र, प्रशांत जगताप चांगला कार्यकर्ता होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाऊ नये, असे प्रशांतचे मत होते. मात्र, त्याच्यांसोबत असणाऱ्या बहुतांश कार्यकर्त्यांनी युती करावी, असे मत मांडले होते. याबाबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.’ ही निवडणूक महापालिकेची आहे. अशा निवडणुकांमध्ये स्थानिक नेते, कार्यकर्ते प्रचारात असतात. अशी संस्कृती यापूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी ऊजवली आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) प्रचार करणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा - रोहित पवार : तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी

पिंपरीतील आघाडी अजित पवारांकडून जाहीर दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील तळवडे (Talwade) येथील सभेत रविवारी रात्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही पक्ष एकत्र येऊन या शहरातील प्रश्न मार्गी लावतील, अशी ग्वाही देतानाच दादागिरी, दमबाजीला बळी पडू नका, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

पुण्यातील आघाडीवरही लवकरच शिक्कामोर्तब पिंपरीप्रमाणे पुण्यातही अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आले असून, तशी घोषणा रोहित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांच्याकडूनही लवकच अधिकृत तसे जाहीर होण्याची शक्यता आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love