Pune Municipal Corporation Election-पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. या सोडतीने शहरातील अनेक दिग्गज नेत्यांचे गणितच बदलले आहे. आरक्षण बदलामुळे अनेक अनुभवी नगरसेवक आणि माजी पदाधिकारी अडचणीत आले आहेत, तर काहींना पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी खुल्या (सर्वसाधारण) गटात उतरण्याची वेळ आली आहे.
२०११ सालच्या जनगणनेनुसार पुणे महापालिकेची लोकसंख्या ही ३४,८१,३५९ एवढी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ही ४,६८,६३३ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही ४०.६८७ एवढी आहे. पुणे महानगरपालिकेसाठी इतकी एकूण ४१ प्रभाग असून त्यामध्ये १६५ सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४१ प्रभागापैकी ४० प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे.
आरक्षण सोडतीचा फटका – माजी उपमहापौर व नगरसेवक अडचणीत
आरक्षण सोडतीनंतर माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अविनाश बागवे, सनी निम्हण, युवराज बेलदरे, प्रकाश ढोरे आणि प्रकाश कदम यांना यावेळी सर्वसाधारण गटातून लढावे लागणार आहे.
तीन माजी उपमहापौर आणि दोन्ही माजी महापौर ‘आऊट’
यापूर्वीच्या सभागृहातील माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सरस्वती शेंडगे आणि सुनीता वाडेकर यांच्या प्रभागांतील जागा अनुक्रमे महिला किंवा खुल्या गटासाठी खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे हे तिघेही सभागृहाबाहेर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२०१७ नंतरच्या कार्यकाळात महापौर झालेल्या मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ यांनाही या वेळी सभागृहात पाहायला मिळणार नाही. टिळक यांचे निधन झाले असून मोहोळ सध्या खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत.
‘पदोन्नती’मुळे बाहेर – पाच आमदार महापालिकेत दिसणार नाहीत
२०१७ नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये माजी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, आणि हेमंत रासने हे आमदार झाले आहेत. त्यामुळे हे पाच जण सभागृहात नसतील.
कसबा पोटनिवडणुकीत आमदार झालेल्या रविंद्र धंगेकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करला आहे, त्यामुळे ते पुन्हा महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता कमी आहे.
‘धंगेकर विरुद्ध बिडकर’ हायव्होल्टेज सामना होणार नाही
२०१७ मध्ये चर्चेत आलेला रविंद्र धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर हा हायव्होल्टेज सामना यावेळी होणार नाही. प्रभाग क्रमांक २४ मध्ये यावेळी ओबीसी महिला आरक्षण पडल्याने धंगेकर यांच्या पत्नीला संधी मिळू शकते, परंतु बिडकर यांना सर्वसाधारण गटातून लढावे लागणार आहे. मागील निवडणुकीत धंगेकर यांनी मोदी लाटेच्या काळात बिडकर यांचा पराभव केला होता.
प्रभाग रचनेतूनच ‘कट’ – काही नेत्यांचा पत्ता गायब
या आरक्षण आणि प्रभाग रचनेमुळे डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, सरस्वती शेंडगे, अविनाश बागवे, आबा बागुल, श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले आणि मनिषा लडकत हे अडचणीत आले आहेत. तर पल्लवी जावळे आणि राहुल भंडारे यांचा प्रभागच नव्या रचनेतून नाहीसा झाला आहे.
प्रभाग ३८ मध्ये दिग्गजांची थेट टक्कर
प्रभाग क्रमांक ३८ मध्ये दोन जागांसाठी दिग्गज आमनेसामने येण्याची शक्यता आहे. माजी महापौर दत्ता धनकवडे, वसंत मोरे, प्रकाश कदम, युवराज बेलदरे हे एकमेकांसमोर येऊ शकतात. तर स्मिता कोंढरे, बाबर, राणी भोसले, मनिषा कदम, आणि माजी नगरसेविका कल्पना थोरवे या महिलांमध्येही तीन जागांसाठी तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे.
राजकीय समीकरणांची नव्याने मांडणी
या सोडतीनंतर आता सर्वांच्या नजरा युती-आघाड्यांच्या चर्चेकडे लागल्या आहेत. कोणत्या पक्षाची आरक्षण फेरीत गाडी अडचणीत येते आणि कोण नवीन चेहरे पुढे आणतो, यावर पुणे महानगरपालिकेचा आगामी राजकीय पट ठरणार आहे.
पुणे महापालिका एकूण जागा १६५
– अनुसूचित जमातींसाठी (एसटी) २ जागा , १ महिला राखीव
– अनुसूचित जातींसाठी (एससी) २२ जागा ११ महिला राखीव
– ओबीसींसाठी ४४ जागा २२ जागा महिला राखीव
– सर्वसाधारण ९७ जागा ४९ महिला राखीव
पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी
अ अनुसूचित जाती महिला
ब अनुसूचित जमाती
क ओबीसी महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळ
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ विमान नगर लोहगाव
अ ओबीसी महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोली
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५ कल्याणी नगर वडगाव शेरी
अ ओबीसी सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६ येरवडा गांधीनगर
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७ गोखले नगर वाकडेवाडी
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९ सुस बाणेर पाषाण
अ अनुसूचित जमाती महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनी
अ ओबीसी सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर
अ ओबीसी सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२ शिवाजीनगर मॉडेल कॉलनी
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन जय जवान नगर
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क घोरपडी मुंढवा
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक केशवनगर
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १६ हडपसर सातववाडी
अ ओबीसी महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
१७. प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी माळवाडी वैदुवाडी
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १८ वानवडी साळुंखे विहार
अ ओबीसी सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द कौसर बाग
अ ओबीसी महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ बिबवेवाडी
अ ओबीसी सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २१ मुकुंद नगर सॅलिसबरी पार्क
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी डायस प्लाॅट
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ नाना पेठ
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती कमला नेहरू रुग्णालय केएमइ रुग्णालय
अ ओबीसी महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई
अ ओबीसी महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २६ घोरपडे पेठ गुरूवार पेठ समताभूमी
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ पर्वती
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
२८ जनता वसाहत हिंगणे खुर्द
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी
अ ओबीसी सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी
अ ओबीसी
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३१ मयूर कॉलनी कोथरूड
अ ओबीसी सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलर नगर
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३३ शिवणे खडकवासला धायरी पार्ट
अ ओबीसी महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे वडगाव बुद्रूक धायरी
अ ओबीसी सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबाग
अ ओबीसी महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर पद्मावती
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी कात्रज डेअरी
अ ओबीसी सर्वसाधारण
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर आंबेगाव कात्रज
अ ओबीसी महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण महिला
इ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक येवलेवाडी
अ अनुसूचित जाती
ब ओबीसी महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी उंड्री
अ अनुसूचित जाती महिला
ब ओबीसी सर्वसाधारण
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण














