स्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे भारतात पहिल्यांदाच ब्रेलमध्ये विमा योजना लाँच

स्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे भारतात पहिल्यांदाच ब्रेलमध्ये विमा योजना लाँच
स्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे भारतात पहिल्यांदाच ब्रेलमध्ये विमा योजना लाँच

मुंबई- स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कं. लि. (स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील रिटेल विमा कंपनीने आज या क्षेत्रातील पहिलीच ब्रेल लिपीतील विमा योजना लाँच केल्याचे जाहीर केले. यामुळे नेत्रहीन समाजाला योग्य माहिती मिळवून देत आरोग्य व विम्याशी संबंधित स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

स्टार हेल्थने वैविध्यपूर्ण आणि आर्थिक सर्वसमावेशकता मोहीम आखत भारतातील ३४ दशलक्ष अंध व्यक्तींना उत्पन्नाच्या संधी देण्याचे ठरवले आहे. कंपनी समाजातील वंचिक, दुर्लक्षित वर्गाला प्रशिक्षण आणि कौशल्य शिक्षण देऊन त्यांना आरोग्य विमा प्रतिनिधी बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

याविषयी बोलताना स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, ‘आम्हाला ब्रेलमध्ये ‘स्पेशल केयर गोल्ड’ ही योजना लाँच करताना आनंद होत आहे. हा समाजाच्या सर्व क्षेत्रांतील व्यक्तींना आरोग्य विमा घेण्याची समान संधी मिळावी या आमच्या मिशनमधला महत्त्वाचा टप्पा आहे.

अधिक वाचा  प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड जिल्हा होणे आवश्यक : आमदार प्रसाद लाड

ही योजना पारंपरिक विमा योजनांपलीकडे जाणारी आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेप्रमाणे पाठिंबा आणि विमा कवच मिळावे यासाठीची आमची बांधिलकी जपणारी आहे. आम्ही सर्वांना सामावणारा विमा उद्योग तयार करण्यासाठी विशेषतः भारतातील ३४ दशलक्ष अंध व्यक्तींचा समावेश करण्यासाठी बांधील आहे. इर्डाच्या ‘सर्वांसाठी विमा’ या तत्वाशी सुसंगत राहात आम्ही दर्जेदार आरोग्य विमा पुरवून या क्षेत्रात जास्त लोकशाही आणण्याबरोबरच समाजातील या वंचित वर्गासाठी उत्पन्नाच्या शाश्वत संधी तयार करत आर्थिक सर्वसमावेशकतेचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

बोलंट उद्योगाचे सह- संस्थापक आणि अध्यक्ष श्रीकांत बोल्ला म्हणाले, ‘दिव्यांग या नात्याने विविध आव्हानांचा सामना करणारी व्यक्ती या नात्याने मी स्टार हेल्थ इन्शुरन्सचे त्यांनी लाँच केलेल्या या पहिल्या आणि सर्वसमावेशक विमा योजनेबद्दल अभिनंदन करतो. स्पेशल केयर गोल्ड ही केवळ एक ब्रेलमधली विमा योजना नसून ती सक्षमता आणि समान संधी देणारी आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींनाही आपले आरोग्य जपण्याचा इतरांइतकांच आधार असतो याची दखल घेत समाजात खऱ्या अर्थाने सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी व माझे कुटुंबीय स्टार हेल्थ इन्शुरन्सचे ग्राहक असून आता मी स्टार हेल्थचा नोंदणीकृत आरोग्य विमा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आता स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी उत्सुक व मदतीच्या शोधात असलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.’

अधिक वाचा  अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्याचे (दि. 26 जुलै) दहावी व बारावीचे पुरवणी परीक्षेचे पेपर पुढे ढकलले

स्पेशल केयर गोल्ड विमा योजनेची ब्रेल आवृत्ती नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड (एनएबी) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. ही विमा योजना ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात अपंगत्व- शारीरीक, सेन्सरी किंवा आकलनात्मक असलेल्या व्यक्तींना खास विमा कवच पुरवते. त्यामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि पूरक सेवांचा समावेश आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love