हगवणे कुटुंबाची ख्याती ‘पैशांचे लोभी भिकारी’ : गावातही नाही पत : काय आहेत हगवणे कुटुंबाचे धंदे ?..

हगवणे कुटुंबाची ख्याती 'पैशांचे लोभी भिकारी'
हगवणे कुटुंबाची ख्याती 'पैशांचे लोभी भिकारी'

पुणे- मुळशीजवळील भुकुम गावात राहणारे हगवणे कुटुंब चर्चेत आले आहे ते त्यांच्या पैशांच्या लोभापायी आणि सुनेच्या कथित हत्येच्या आरोपांमुळे. वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भात या कुटुंबावर गंभीर आरोप केले जात असून, त्यांच्या लोभी वृत्तीमुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. हगवणे कुटुंबाची श्रीमंती असली तरी त्यांना ‘पैशांचे लोभी भिकारी’ असे संबोधले जात आहे. सुनांचा छळ करणाऱ्या या क्रूर कुटुंबाची गावात कोणतीही पत किंवा इज्जत शिल्लक नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे या कुटुंबातील सदस्यांवर वैष्णवीच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पैशांसाठी हपापलेल्या या कुटुंबाने वैष्णवीकडून ५१ तोळे सोनं, चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर गाडी असा मोठा हुंडा घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांची भूक इतकी अजस्त्र होती की त्यांना आणखी दोन कोटी रुपये हवे होते. याच पैशांसाठी हगवणे कुटुंबाने वैष्णवीला अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत वैष्णवीच्या शरीरावर वळ आणि गंभीर जखमा झाल्या होत्या, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.हगवणे यांची लालसा इतकी वाढली होती की, याच लालसेपोटी त्यांच्यावर जनतेकडून टीकेचा भडीमार होत आहे. सुनेच्या पैशांवर मजा मारणे हा या कुटुंबाचा एक प्रकारे ‘धंदाच’ बनलेला होता असे म्हटले जात आहे.

अधिक वाचा  चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आलेल्या तरुणाचा खून

केवळ वैष्णवीच नाही, तर या कुटुंबाने मोठी सून मयुरीचाही असाच छळ केल्याचे समोर आले आहे. सुनांचा छळ करणाऱ्या या क्रूर कुटुंबाची गावात कोणतीही पत किंवा इज्जत शिल्लक नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हगवणे कुटुंब शेती आणि वॉशिंग सेंटरचा व्यवसाय करते. राजेंद्र हगवणे राजकारणात सक्रिय होते. शशांक आणि सुशील हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात आहेत, तसेच राजकारणातही सक्रिय होते. मात्र, व्यवसाय आणि राजकारणात असूनही गावातले लोक त्यांना मान देत नव्हते. शेती, वॉशिंग सेंटर आणि बांधकाम यासोबतच सुनांच्या माहेरहून पैसे मागणे हा हगवणे कुटुंबाचा आणखी एक ‘धंदा’ होता. त्यांच्या पैशांची हीच हाव वैष्णवीच्या हत्तेपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे.

हगवणे कुटुंबाच्या या कृत्यांमुळे मुळशीतील भुकुम गावालाही काळीमा फासला गेला आहे. या प्रकरणामुळे गावाचे नाव नाहक बदनाम झाले आहे. गावाचे नाव मातीत मिळवणाऱ्या आणि सुनेची हत्या करणाऱ्या हगवणेंना फाशीवर लटकवा, अशी मागणी आता राज्यभरातील जनतेकडून होत आहे. हगवणेंच्या पापांचा हिशेब झाल्याशिवाय वैष्णवीला न्याय मिळणार नाही, असे बोलले जात आहे.

अधिक वाचा  वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर खूनच : सुप्रिया सुळे

या प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक केली होती. त्यानंतर गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनाही आज पहाटे स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून सत्य समोर यावे आणि दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love