पुणे– थंडी, खोकला आणि ताप येत असल्याने कोरोनाची लक्षणे आहेत, कोरोना टेस्ट करून घ्या, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर शिवाजी होळकर ( वय ६७) या जेष्ठ नागरिकाने घाबरून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे भोसरी येथे उघडकीस आली आहे. डॉक्टरांनी कोरोनाची भीती घातल्याचे सुसाईड नोटमध्ये मृत शिवाजी होळकर यांनी म्हटले आहे.
शिवाजी होळकर त्यांना काही दिवसांपासून थंडी, खोकला आणि ताप येत होता, त्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले होते. तुम्हाला कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे कोरोना टेस्ट करून घ्या, असे डॉक्टरांनी शिवाजी होळकर यांना सांगितले होते. मात्र, घाबरलेल्या होळकर यांनी काहीही विचार न करता कोरोना टेस्ट करण्याच्या अगोदरच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.दरम्यान, त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, ‘गेल्या आठ दिवसांपासून थंडी-ताप व खोकला येत होता. मी डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी करोनाची भीती घातली. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. मात्र, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.