अखेर संभाजी विडीचे नाव बदलण्याचा साबळे वाघिरे आणि कंपनीचा निर्णय


पुणे-विडी सारख्या व्यसनाच्या वस्तूला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव नको, हे नाव हटवा अशी मागणी विविध स्तरातून होत होती. तर या  मुद्य्यावरून आंदोलने, उपोषणे सुरू झाल्याने वातावरण तापले आहे. त्यामुळे अखेर साबळे वाघिरे आणि कंपनीने ते उत्पादित करीत असलेल्या संभाजी विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.                                                        

 साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय साबळे यांनी पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दरम्यान, आमच्या उत्पादनाचे नाव लवकरात लवकर बद्दलण्याबत आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही संभाजी विडीचे नाव बदलण्याचे निश्चित केले आहे, परंतु त्यासाठी वेळ लागणार असल्याचे साबळे यांनो स्पष्ट केले.                                          

अधिक वाचा  धनुर्विद्या स्पर्धेत निरवा पटेलने लक्ष्य गाठून पहिला क्रमांक पटकावला

 साबळे म्हणाले, शिवप्रेमींना आमची विनंती आहे की कृपया याचा विचार व्हावा. 70 हजार विडी कामगारांच्या रोजगारावर गदा येऊ शकते. नवीन नाव कायदेशीर रजिस्टर करून ते नवीन नाव आमच्या ग्राहकांपर्यंत पोहचवता येईल आणि यामुळे आमच्या ग्राहकांची साखळीही तुटणार नाही. लोकभावनेचा आदर करून आणि संभाजी ब्रिगेड, शिवधर्म प्रतिष्ठान व इतर शिवप्रेमी संघटना आदी लोक भावनांचा आदर करून आम्ही नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शिवप्रेमींची मागणी पूर्ण होईल आणि 60 ते 70 हजार विडी कामगारांच्या प्रपंचवरही कुऱ्हाड येणार नाही.  शिवप्रेमींनी यापूर्वी जसे सहकार्य केले तसेच सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले.                                    

अधिक वाचा  असंवेदनशिलतेची परिसीमा: कोरोनाच्या भीतीने मृतदेह सह तास पडून

1932 सलापासून आमची कंपनी आहे. आमच्या वडवडिलांनी विडी व्यवसाय सुरू करताना या उत्पादनाला संभाजी हे नाव आदरापोटीच दिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करण्याचा आमचा हेतू नाही. असे सांगून साबळे म्हणाले, आम्ही नवीन 4 ते 5 नवीन नावे रजिस्ट्रेशन साठी दिले आहेत, त्यावरून जे नाव मिळेल ते नाव देण्यात येईल. नाव बद्दलण्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे, परंतु लोकभावनांचा आदर करून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे संजय साबळे यांनी सांगितले

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love