#हीट अँड रन प्रकरण : “मला कुणाचे फोन आले होते त्यांची नावं मी घेणार”- डॉ. अजय तावरे

I will take the names of those whose calls I received
I will take the names of those whose calls I received

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅंपल’मध्ये फेरबदल केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ससूनच्या डॉक्टर अजय तावरे याने पोलिसांना दिलेल्या महितीमुळे खळबळ उडाली आहे. डॉ, तावरेने, “माझे नाव ज्यांनी तुम्हाला सांगितले त्यापद्धतीने मला कुणाचे फोन आले होते त्यांची नावं देखील मी घेणार आहे. मी शांत बसणार नाही” असे म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणात आणखी काही नावे समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

‘हीट अँड रन’ प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांच्यावर आहे. त्यांच्यासहित डॉ. श्रीहरी हरनोळ आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक वाचा  निवृत्त एसीपी आहे, माझे कोणी काही करू शकत नाही असे म्हणत शिक्षिकेवर बलात्कार

दरम्यान, डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोळ यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अजय तावरे यांनी पुणे पोलिसांना कारवाई दरम्यान सांगितले की, ‘मला ज्यापद्धतीने अटक केली. माझे नाव ज्यांनी तुम्हाला सांगितले त्यापद्धतीने मला कुणाचे फोन आले होते याची नावं देखील मी घेणार आहे. मी शांत बसणार नाही’ त्यामुळे आता डॉ. तावरे कोणाकोणाची नावे घेणार याकडे पुणे पोलिसांसोबत सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचे नाव समोर आले आहे. त्याबाजूने पोलिस तपास करत आहेत.

पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला गेला. यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.  यासाठी आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालने डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क केला होता. एका लोकप्रतिनिधीने फोनवरून डॉ. तावरे यांना आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितले असल्याचे तापसात उघड झाले आहे.

अधिक वाचा  भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

डॉ. अजय तावरे यांचे वकील जितेंद्र सावंत यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ब्लड सॅम्पलममध्ये छेडछाड केली हा आरोप आहे. आरोपी त्यावेळी सुट्टीवर होते. त्यामुळे त्यांचा या आरोपात सहभाग नव्हता. जी कलम लावण्यात आली आहेत, ती जामीनपात्र होती. पोलिसांकडून जाणूनबुजून कलमे लावण्यात आली आहेत. अजय तावरे हे २०  दिवसांपासून सुट्टीवर होते. लोकसेवकाच्या सांगण्यावरून ब्लड सॅम्पलमध्ये बदल केला असा आरोप पोलिसांचा होता”, अशी प्रतिक्रिया अजय तावरे यांच्या वकिलांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love