#Fake visa gang jailed: बनावट व्हिसा बनवणारी टोळी जेरबंद : तब्बल 48 बनावट व्हिसा जप्त

मोक्कातील गुंडांकडून तरुणावर वार करून खून
मोक्कातील गुंडांकडून तरुणावर वार करून खून

Fake visa gang jailed–ब्रुनेई( Brunei) देशात जाण्यासाठी बनावट व्हिसा बनवणारी टोळी(Fake visa gang) हिंजवडी(Hinjewadi) पोलिसांनी जेरबंद केली आहे. बनावट व्हिसा (Fake Visa) बनवणाऱ्या तिघांसह शिक्का बनवून देणाऱ्यास देखील पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने तब्बल १२५ लोकांकडून पासपोर्ट(Passport) घेऊन त्यांना व्हिसा बनवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतले असल्याचे उघडकीस आले आहे.(Fake visa gang jailed)

विजय प्रताप सिंग (वय ४४, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश), किसन देव पांडे (वय ३५, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश), हेमंत सीताराम पाटील (वय ३८, रा. किवळे, पुणे. मूळ रा. गवळे नगर, धुळे), किरण अर्जुन राउत (वय ३४, रा. शाहूनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अधिक वाचा  जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायात काम करत होते. तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. हेमंत पाटील याने यापूर्वी नोकरीच्या आमिषाने लोकांना फसवण्याचा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या विजय आणि किसन या साथीदारांसोबत मिळून लोकांच्या फसवणुकीचा नवीन फंडा शोधून काढला. भारतातून वेल्डर, वाहन चालक, प्लंबर असे काम करणारे कामगार एक ते दोन वर्षांसाठी विदेशात जातात. तिथे काम करून एकरकमी पैसे घेऊन भारतात येतात. त्यांना व्हिसा देण्यासाठी एजंट कंपनी सुरु करून त्याद्वारे लोकांकडून व्हिसा काढण्यासाठी पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन पळून जायचे. त्यानुसार मागील चार महिन्यांपासून आरोपींनी blue ocean marine company या नावाने कंपनी सुरु केली.

अधिक वाचा  समर्थांसाठी प्रभु श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज : सरसंघचालक

व्हिसा काढून देण्यासाठी लोकांकडून खरे पासपोर्ट घेतले जात. विश्वास संपादन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांना सांगितले जात. त्यानुसार नागरिकांकडून कागदपत्रे आल्यानंतर पासपोर्टवर ब्रुनेई देशाचा बनावट शिक्का मारून त्यांना खरे व्हिसा असल्याचे भासवून दिले जात. हे व्हिसा घेऊन विमानतळावर गेल्यानंतर तिथे हे शिक्के बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही लोकांनी दिल्ली येथील ब्रुनेई देशाच्या दुतावासात जाऊन खातरजमा केली. त्यावेळी त्यांच्या पासपोर्टवर बनावट शिक्के मारले असल्याची खात्री झाली.

त्यानुसार मनीष स्वामी (वय ३२, रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलिसांनी कस्तुरी चौकाजवळ असलेल्या आरोपींच्या कार्यालयात छापा मारून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.. या कारवाई मध्ये एकूण १२५  पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love