#Naval Chief Admiral R. Harikumar: २०४७ पर्यंत संपूर्ण नौदल आत्मनिर्भर होईल- नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार

The entire Navy will be self-sufficient by 2047
The entire Navy will be self-sufficient by 2047

Naval Chief Admiral R. Harikumar : ‘आयएनएस विक्रांत’ (INS Vikrant) ही पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ( First indigenous aircraft carrier) येत्या काही महिन्यांत कार्यान्वित केली जाईल. तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेच्या मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. २०४७ पर्यंत संपूर्ण नौदल आत्मनिर्भर (self-sufficient)करण्याचे उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण होईल. त्यासाठी खासगी उद्योगांसह( Private industry) अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्याद्वारे नौदलाकडे(Navy) नसलेले तंत्रज्ञान विकसित केले जाणार असल्याची माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार(Naval Chief Admiral R. Harikumar) यांनी  दिली.(The entire Navy will be self-sufficient by 2047)

लोणावळा(Lonavala) येथील आयएनएस शिवाजी(INS Shivaji) येथे झालेल्या कार्यक्रमानंतर नौदलप्रमुखांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मालदीव(Maldives) प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, मालदीवशी आपले  चांगले संबंध आहेत. मालदीवचे अनेक कर्मचारी आयएनएस शिवाजीसह भारतातील प्रशिक्षण आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. मात्र सरकारच्या निर्देशांनुसार कार्यवाही करण्यात येईल.

अधिक वाचा  कधी कधी वाटतं आत्ता जो निर्णय घेतला आहे तो २००४ सालीच घ्यायला पाहिजे होता- अजित पवार

सागरी चाचेगिरीविरोधी कारवाई २००८ पासून सुरू आहे.  चाचेगिरीचा सामना करण्यासाठी आतापर्यंत १०६ जहाजे तैनात केली आहेत.  संशयास्पद वाटणारी मासेमारी जहाजे, नौका, वेगवान बोटी यांचा शोध घेतला जात आहे. चाचेगिरी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्यापासून परावृत्त केले जाईल. सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने हिंदी महासागरातील चाचेगिरी रोखण्यासाठी नौदल आक्रमक पद्धतीने काम करत आहे, असे सांगत हिंदी महासागराच्या प्रदेशातयुद्धनौकांसह सुमारे दहा चिनी जहाजे  आहेत. मात्र, या प्रदेशातील देशाच्या सागरी हितासाठी त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणात नौदलाचे युनिट स्थापन करणार :  नौदलप्रमुख

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीचे महत्त्व मोठे असून,या भागात लवकरच नौदलाचे एक युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही नौदलप्रमुख आर. हरिकुमार यांनी दिली.

अधिक वाचा  पुणे विभागात ५० लाख घरांवर तिरंगा फडकविला जाणार

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच नौदल दिन साजरा करण्यात आला होता.   त्याबाबत विचारले असता नौदलप्रमुख हरिकुमार म्हणाले, कोकण किनारपट्टी सुंदर तर आहेच. शिवाय तिचे महत्त्वही वेगळे आहे. त्यादृष्टीने तेथे नौदलाचे स्वतंत्र युनिट स्थापन करण्याचा मानस आहे. आगामी काळात त्यादृष्टीने पावले उचलली जातील.

योग ही निरोगी जीवनपद्धती : नौदलप्रमुख

दरम्यान, योगाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला निरोगीमय जीवन देण्याच्या उद्देशाने जोडणाऱ्या “भारत योग माला” या कैवल्यधाम योग संस्थेच्या अभियानाचे उद्घाटनही  लोणावळा येथील योग संस्थेमध्ये नौदल प्रमुख आर. हरी कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कैवल्यधाम योग संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारी, संस्थचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, संयुक्त संशोधन संचालक डॉ. रणजीत सिंग भोगल, ब्रिगेडियर (निवृत्त) सुहास धर्माधिकारी हे मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बोलताना नौदल प्रमुख आर. हरी कुमार हरिकुमार म्हणाले, कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या भारत योगमालेच्या माध्यमातून योगाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे.  योगा ही निरोगी जीवनाची एक महत्त्वाची पद्धती आहे. ती आत्मसात केल्यास मनुष्य हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतो, याकरिता प्रत्येकाने दिवसातील काही वेळ हा योगासाठी देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या अभियानास व कैवल्यधाम शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love