Sharad Mohol Murder Case : ऑक्टोबर(October) महिन्यात गुंड शरद मोहोळ(Sharad Mohol) याला मारण्याच्या प्रयत्न झाला होता. मात्र, तो निष्फळ ठरला. यानंतर मुन्ना पोळेकर(Munna Polekar) आणि नामदेव कानगुडे(Namdeo Kangude) हे आरोपींची पिरंगुट(Pirangut) परिसरात वकिलांसोबत मिटिंग झाल्याचे तपासात समोर आले आहे. या दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police) (Sunil Tambe) यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, दोन्ही आरोपी वकिलांची रवानगी न्यायालयीन कोठडी(Judicial Custody ) करण्यात आली असून, नव्याने अटक केलेल्या दोन आरोपीना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Was there an attempt to kill Sharad Mohol in the month of October?)
कुख्यात गुंड शरद मोहोळचा (Sharad Mohol) खून प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या ऍड. रवींद्र पवार (Adv. Ravindra Pawar) आणि ऍड. संजय उढाण (Adv. Sanjay Udhan) या दोन आरोपी वकिलांची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने त्यांच्यासह गुन्हे शाखेने बुधवारी अटक केलेल्या धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे या दोघांनाही गुरुवारी बिराजदार कोर्टात हजर करण्यात आले.
यावेळी सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले, की आरोपी वटकर आणि शेडगे यांनी मध्यप्रदेशमधून मागवून आरोपींना शस्त्रे दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे .शस्त्रे पुरविणाऱया वितरकाचा शोध घेणे बाकी आहे. तसेच यात एकूण 4 शस्त्रे मागविण्यात आली आहेत, त्यातील 3 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आणखी काही शस्त्रे पुरविली आहेत का? याचाही शोथ घ्यायचा आहे. 1 ते 6 आरोपींनी ऑक्टोबरमध्ये मोहोळवर खुनी हल्ला करायचा प्रयत्न केला. तो निष्फळ ठरला. यानंतर आरोपीनी दोन्ही वकिलांनी पिरंगुटला मिटिंग घेतली होती. ते नेमके कुठे भेटले? आणखी कोण बरोबर होते? त्यांच्या मास्टरमाईंडचा शोध घ्यायचा आहे. या दोघांना मास्टर माईंड कोण आहे? हे माहिती आहे. यातून मोठा कट समोर आला आहे. दोघांना मोहोळ याचा खून होणार याची माहिती होती. जेव्हा आरोपींचा शोध घेतला जात होता. तेव्हा हे दोघे आरोपींना भेटले होते. त्यांची मिटिंग झाली. गुन्हा संवेदनशील आहे. आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्मयता आहे.
सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपींचे वकील ऍड. सुधीर शहा यांनी युक्तिवाद केला, की पोलिसांकडे कोणताही वेगळा पुरावा नाही. दोन्ही वकिलांनी सगळी माहिती पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही.