गुजराथ सरकारकडून शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याच्या उभारणीसाठी रु ५ कोटींची देणगी

Donation of Rs 5 Crores from Gujarat Government for the construction of the next phase of Shiv Srishti
Donation of Rs 5 Crores from Gujarat Government for the construction of the next phase of Shiv Srishti

Shiv srishti — कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या (Maharaja Shiv chatrapati Pratishthan) वतीने न-हे – आंबेगाव (Narhe – Ambegaon) येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला (Shiv srishti) गुजराथ सरकारकडून (Govt. Of Gujrath) ५ कोटी रुपयांची देणगी गुरुवारी सुपूर्त करण्यात आली. (Donation of Rs 5 Crores from Gujarat Government for the construction of the next phase of Shiv Srishti)

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे (Maharaja Shiv chatrapati Pratishthan) विश्वस्त विनीत कुबेर(Vinit Kuber) यांनी गुजराथचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल(Bhupendra Patel) यांकडून मुख्यमंत्री निवासस्थानी विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत धनादेशाच्या स्वरूपात ही देणगी स्वीकारली. गुजराथ राज्याचे वन व पर्यटन मंत्री मुलु बेरा(Mulu Bera), पर्यटन सचिव सौरभ पारधी(Saurabh Pardhi) , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(Rss) ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप जाधव (Sandeep Jadhav) आदी यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर केला सोमय्यांचा सत्कार : जोरदार घोषणाबाजी करत भाजपचे शक्तिप्रदर्शन

याबद्दल अधिक माहिती देताना विनीत कुबेर म्हणाले, “शिवसृष्टीच्या रुपाने महाराष्ट्रात साकारत असलेल्या ऐतिहासिक थीम पार्कला (Theam Park) मदत करण्याची इच्छा गुजराथचे मुख्यमंत्री (Gujrath cm) भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी या आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ५ कोटी रुपयांचा धनादेश प्रतिष्ठानला सुपूर्त करण्यात आला. यावेळी पटेल यांना शिवसृष्टीची संपूर्ण माहिती देत या ठिकाणी त्यांनी नक्की भेट द्यावी असे आग्रहाचे निमंत्रण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना देण्यात आले.”

या देणगीचा उपयोग शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी करण्यात येणार असून यामध्ये प्रतापगडावरील (Pratapgad) भवानीमाता मंदिराबरोबरच (Bhavani Mata Temple) रंगमंडल(Rangmandal), गंगासागर तसेच गेल्या ३५० वर्षात शिवछत्रपतींच्या कल्पनेतील स्वराज्य संकल्पनेच्या दिशेने झालेली वाटचाल, मंदिरांचा जीर्णोध्दार, स्वभाषा, स्वधर्म या विषयात पुढील पिढ्यांनी केलेले कार्य याची माहिती देणारे दालन यांचा समावेश असेल. याबरोबरच छत्रपतींच्या राजसभेची निर्मिती पूर्ण करण्याचाही प्रतिष्ठानचा प्रयत्न राहील, अशी माहिती देखील कुबेर यांनी दिली. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love