पोलिसांनी अटक केलेला  बांगलादेशी निघाला बॉम्बस्फोटातील आरोपी

A Bangladeshi arrested by the police turned out to be the accused in the bomb blast
A Bangladeshi arrested by the police turned out to be the accused in the bomb blast

पुणे- पुणे शहरामध्ये विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या नागरिकांमध्ये बॉम्ब स्फोटातील (Bomb explosion)आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (A Bangladeshi arrested by the police turned out to be the accused in the bomb blast)

कमरुल मंडल (Kamrul Mandal) असे या आरोपीचे नाव असून त्याने बेनापोल (Benapol), बांगलादेश(bangladesh) याठिकणी बॉम्ब स्फोट (Bomb explosion) केले होते. या प्रकरणी त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर भारतात घुसखोरी करुन तो पुण्यात वास्तव्य करत होता, अशी माहिती हडपसर पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. आरोपी मंडल याने पुण्यातून भारतीय पासपोर्ट तयार करुन घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक वाचा  चार दहशतवाद्यांच्या चौकशीत देशभरातील बॉम्बस्फोटाचा कट उघडकीस

कमरुल मंडल याच्यासह इतर सहा संशयित बांगलादेशी घुसखोरांना १५ ऑगस्ट २०२१ रोजी ताब्यात घेतले होते. त्यावेळी मंडल याने आपण  बांगलादेशी असल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये याबाबत नोंद केली. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास न करता हडपसर पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते.

दरम्यान, या प्रकरणात भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय) युनिट (सदर्न कमांड) ने लक्ष घातल्यानंतर हडपसर पोलिसांनी पुन्हा मंडल सह बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना १४ ऑक्टोबर रोजी अटक केली. तर इतर ११ जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींना आधार, पॅन कार्ड यासारखे भारतीय ओळपत्र पुण्यातील एजंटने तयार करुन दिल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी  कागदपत्रे तयार करुन देणारा पुण्यातील एजंट शंकर उर्फ संग्राम नेकरामसिंग पवार (वय- ५३, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मोहम्मदवाडी, पुणे) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहेत.

अधिक वाचा  Ayodhya's first court case : स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग- १३ : ..... अखेर शुक्रवारचा देखील नमाज बंद झाला

तपासादरम्यान, अटक करण्यात आलेले बांगलादेशी आरोपी पश्चिम बंगाल येथील बँक खात्यातून बांगलादेशात पैसे पाठवत असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय धागेदोरे असणाऱ्या रॅकेटचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यालयात सांगितले. न्यायालयाने अटक केलेल्या पाच आरोपींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांनी माहिती घेतली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love