नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार आणि अव्वल यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने काल (१५ ऑगस्ट) अचानक अलविदा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक्झिट घेतली. अगदी साध्या पद्धतीने जवळजवळ दीड दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द इन्स्टाग्राम पोस्टद्वारे धोनीने संपविली.
‘मै पल दो पल का शायर हुं, दो पल मेरी कहाणी है’ अशी भावूक पोस्टही त्याने टाकली होती. धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, जो 2019 च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीतला सामना होता. तोच हा शेवटचा सामना ज्यामध्ये धोनीवर लाखो चाहत्यांच्या नजरा होत्या. परंतु धोनीच्या चाहत्यांचे स्वप्न डोळ्यातील अश्रूंमध्ये वाहून गेले होते. विकेट्स दरम्यान वादळासारखा धावणारा हा खेळाडू पदार्पणानंतर पॅव्हेलियनला परतला आणि शेवटच्या सामन्यात धावबाद झाला.
तिकीट कलेक्टर ते ट्रॉफी कलेक्टर म्हणून ओळख निर्माण केलेल्या धोनीला 2004 मध्ये भारतीय संघाकडून खेळण्याची पहिली संधी मिळाली. पण त्या सामन्यात धोनी स्वत:ला सिद्ध करु शकला नाही. धोनीने 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्यावेळी भारताची धावसंख्या पाच विकेट्ससाठी 180 होती. दुसर्या बाजूला मोहम्मद कैफ होता आणि तो 71 धावांवर नाबाद होता. तेव्हा पहिल्यांदाच भारतीय ड्रेसिंग रूममधून लांब केसांचा एक तरुण फलंदाजीसाठी मैदानावर जाताना दिसला होता.
धोनीने आपल्या कारकिर्दीचा पहिला चेंडू खेळला आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मोहम्मद कैफला त्याने धाव घेण्यासाठी त्याची पावले पुढे पडताना पाहिली आणि तोही धाव घेण्यासाठी धावला परंतु पण कैफने नंतर त्याला नकार दिला. पण जेव्हा धोनी क्रीजवर परतला तोपर्यंत खेळ आधीच बदलला होता. विकेटवर जमा झालेली ओल हवेत पसरली होती. त्यावेळी पहिल्याच चेंडूवर धोनी धावबाद झाला होता.
धोनी एकदिवसीय अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसला होता. 2019 विश्वचषकातील या उपांत्य सामन्यात धोनीने 72 चेंडूत एकूण 50 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या षटकांच्या तिसर्या बॉलवर तो दोन धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होता आणि त्यादरम्यान तो धावबाद झाला. भारताने केवळ हा सामना गमावला नाही, तर वर्ल्ड कपमधूनही भारत बाहेर पडला. धोनीच्या धावबादच्या छायाचित्राने संपूर्ण देशाची घोर निराशा झाली होती.