पुणे- महाराष्ट्रातील नामवंत, मनस्वी व जेष्ठ कला दिग्दर्शक (Art Director) स्व. नितीन चंद्रकांत देसाई (NItin Chandrkant Desai) यांनी आत्महत्येपुर्वी आपल्या ॲाडीओ क्लिपच्या माध्यमातुन एक प्रकारे आत्महत्येस कारणीभुत ठरणारी परिस्थितीच एक प्रकारे विषद केली आहे. हे धक्कादायक व व्यवस्थेपुढे हतबलता विषद करणारी घटना असुन, महाराष्ट्राच्या सांस्कृतीक अस्मितेला खच्ची करणारी आहे. त्यामुळे या आत्महत्येची व ११ ॲाडीओ क्लीप (Audio Clip) व त्यांचे फोनची सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेऊन न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. (There should be a ‘judicial inquiry’ into Nitin Desai’s suicide)
महाराष्ट्रातील एक मराठी कलावंत मेहनतीने व स्वकर्तुत्वाने पुढे येऊन स्वतःचे हिंमतीवर यशस्वी वाटचाल करीत स्वतःचा स्टुडीओ ऊभा केला. मात्र अचानक त्यांना व त्यांचे स्टुडिओत येणारे काम बंद झाले व पर्यायाने त्यांचे वरील कर्जाचा बोजा वाढत गेला. एडलवाईज या शेअर मार्केट मधील गुंतवणुक कंपनीने त्यांना कर्ज दिल्याचे पुढे आले आहे.
एखादी पतसंस्था, कोणत्याही उद्योजकास मोठे कर्ज देते तेंव्हा त्याचे ‘उत्पन्नाचे स्त्रोत’ तपासते, मात्र त्यांची कर्ज थकबाकी वाढताना, त्यांच्या स्टुडिओत येणारी कामे का अचानक बंद झाली? हे पहाणे व त्याविषयी हालचाली करणे एजलवाईज कंपनीचे काम नव्हते काय..? हा प्रश्नही समोर येतो.
काही वेळा व काही ठीकाणी एखादी पत-संस्था, मोक्याची जागा वा उद्योग हस्तगत करण्यासाठी, काही पतसंस्थाना व सुत्रधारांना हाताशी धरून ते ऊद्योग एनपीए वा बुडीत टाकुन कर्ज वसुलीच्या नोटीसा वा लिलाव निवडक माध्यमात देऊन, ते उद्योग वा जागा गिळंकृत करण्याची कारस्थाने नाकारु शकत नाही.
त्यामुळे कदाचित नितीन देसाईंनी हे आत्महत्येचे पाऊल ऊचलले नसते तर एडलवाईज कडुन कथित लिलाव नोटीसद्वारे त्यांचा ‘एनडी स्टुडीओ’ हस्तगत करण्याची कुठली योजना होती काय? हे देखील पुढे आले पाहीजे.
दिवंगत नितीन देसाई यांनी शेवटच्या काळात काही प्रयत्न केले काय? कुणाशी फोन वा संपर्क करण्याचे प्रयत्न केले काय ? हे देखील पुढे आले पाहीजे. त्यामुळे स्व. नितीन देसाई यांचे फोन व रेकॅार्ड तातडीने सर्वोच्च न्यायायालयाचे देखरेखीखाली कस्टडीमध्ये घेऊन, सखोल चौकशी करावी व महाराष्ट्राच्या कर्तबगार मराठी कलावंताचे जीवन संपवण्यासाठी कोण कारणीभुत आहेत , त्या खुन्यांना उघडे केले पाहीजे व त्यांचेवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देखील जस्टीस चंद्रचूड महाराष्ट्राचे असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.