नऱ्हे येथील कचरा संकलनासाठी ४ टेंपो समर्पित : राष्ट्रवादी काँग्रेसचे भूपेंद्र मोरे यांचा उपक्रम


पुणे : महापालिकेत नऱ्हे गावाचा समावेश झाला तरी देखील अजूनही मूलभूत समस्या जशाच्या तशाच आहेत.  कचरा व्यवस्थापन ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने स्वखर्चातून ४ टेम्पो मोफत कचरा संकलनासाठी समर्पित करण्यात आले. नऱ्हे गावात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.

‘जेथे प्रशासन कमी तेथे आम्ही’ अशी भावना व्यक्त करताना भूपेंद्र मोरे म्हणाले, प्रशासन नऱ्हे गावाला नेहमीच दुय्यम वागणून देत असून अनेकदा आंदोलने करून देखील नऱ्हे गावच्या समस्येकडे दर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच स्वयंपूर्तीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवसभरात सुमारे ४० टन कचरा संकलित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  

अधिक वाचा  शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय- डॉ. शां.ब. मुजुमदार यांचे मत : सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान

यावेळी सुभाष थेऊरकर, सुरेश वसवे, विजय हांडगे, भाग्येश पाथरुडकर, राजेंद्र जाधव, विठ्ठल सूर्यवंशी, प्रशांत मते, संजय सुर्वे, भाऊ गायकवाड, कविता हागवणे, रेखा पाडळे, श्रद्धा हगवणे, नंदा मानकर यांच्यासह नऱ्हे प्रभागातील अनेक महिला व रहिवासी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love