पत्नीच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय सैनिकाची आत्महत्या


पुणे- पत्नीच्या जाचाला कंटाळून एका २४  वर्षीय लष्करी सैनिकाने पुण्यात आत्महत्या केली आहे. गोरख नानाभाऊ शेलार असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. भारतीय सेना दलात नर्सिंग असीस्टन्ट या पदावर तो कार्यरत होता. दरम्यान, या जवानाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ बनवला होता आणि एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. ते सर्व पोलिसांनी जप्त केले आहे.

याप्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगिता युवराज पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. शहादा, जि. नंदूरबार) यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केशव पाटील (शेलार) यांनी तक्रार दिली आहे.

मयत गोरख शेलार यांचा विवाह अश्विनी युवराज पाटील यांच्याशी १६ फेब्रुवारी २०२१ मध्ये झाला होता. विवाह झाल्यापासूनच पत्नीने आणि सासरच्या माणसांनी गोरख याला अनेक प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती. मयत गोरखला त्याची नोकरी घालवतो तसेच पत्नीचा गर्भपात केला असल्याचा आरोप करत धमक्या देण्यात आल्या आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप प्रकरणी केशव पाटील (शेलार) यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  शिव छत्रपतींच्या ‘न्याय-निती’चा आदर्श ऊभा आहे याकडे न्यायसंस्थेचे लक्ष वेधणे काळाची गरज - गोपाळदादा तिवारी