11 लाखांचे मेफेड्राॅन जप्त :दोघांना अटक


पुणे- पुण्यातील कात्रज परिसरातून तब्बल अकरा लाख किमतीचे मेफेड्राॅन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी विसारत अली सना उल्ला (वय 32) आणि ब्रिजेश उपेंद्र शर्मा (वय 38) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

यावबाबत पॉइसन्नी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक नेहेमीप्रमाणे गस्त घालत असताना कात्रज परिसरातील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेसामोर एक स्विफ्ट उभी असलेली त्यांना दिसली. त्या कारमध्ये दोन व्यक्ति संशयास्पद हालचाल करताना त्यांना दिसले. त्यांना पोलिसांनी हटकले असता ते उदवाउडावीची उत्तरे देवू लागले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेतली. तेव्हा कारमध्ये 212 ग्रॅम फेड्राॅन) पोलिसांच्या हाती लागले. याची बाजारातील किंमत 10 लाख 63 हजार इतकी आहे.

अधिक वाचा  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींंचे जमीन अर्ज फेटाळले

त्यांची कार, जवळील रोख मुद्देमाल आणि मेफेड्रोन असा एकूण पंधरा लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून  आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात   एनडीपीएस कलम 8(क), 22(क),29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love