भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा; गोळीबार करत लुटले ३५ तोळे सोने


भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा; गोळीबार करत लुटले ३५ तोळे सोने https://news24pune.com/?p=933

पुणे—पुणे – सातारा महामार्गावरील  खेड शिवापूर भागातील कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या   सराफी दुकानात भर दिवसा पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करून ३५ तोळे सोने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या कापूरहोळ गावात काल सायंकाळी पाचच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून  ५ जण उतरले. यातील तिघांनी पोलिसांचा गणवेश घातला होता. हे सर्व बालाजी ज्वेलर्समध्ये गेले आणि त्यांनी दुकान मालकाला, तुम्ही चोरीचे सोने विकत घेतले, त्यामुळे तुमची चौकशी करायची असल्याचे सांगत दुकानातील आतील बाजूस नेले.

त्यानंतर आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील ३० ते  ३५  तोळे सोने चोरून नेले. जाता जाता त्यांनी हवेत बंदुकीच्या ७ गोळ्या देखील झाडल्या.दुकानातून बाहेर पडल्यानंतर आरोपी स्विफ्ट गाडीने साताऱ्याच्या दिशेने निघून गेले. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपींना पकडण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी लावण्यात आली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक वेताळ करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Sri Ganesh birth ceremony : 'दगडूशेठ' गणपती मंदिरात मंगल स्वरांच्या नामघोषात गणेशजन्म सोहळा संपन्न