सुशांतसिंगची बहिण श्वेताने काय केली पंतप्रधानांकडे मागणी?


मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणा नंतर त्याची बहिण श्वेता कीर्ति सिंहने सोशल मिडीयावर मोहीम उघडली आहे. सुशांतसिंगला न्याय मिळावा यासाठी तिच्या अनेक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. या मोहिमेबरोबरच श्वेता आपल्या भावाशी संबंधित अनेक आठवणीही शेअर करीत आहे. आता श्वेताने इंस्टाग्राम आणि ट्वीटरद्वारे पंतप्रधान मोदींना संबोधित करत न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

https://www.instagram.com/p/CDVGI7hFxSJ/?utm_source=ig_embed

पंतप्रधान मोदींना संबोधित करताना श्वेता कीर्ति सिंह हिने इंस्टाग्रामवर लिहिलंय की, ‘प्रिय महोदय, माझे हृदय सांगते की, तुम्ही नेहेमी सत्यासाठी आणि सत्याच्या बाजूने उभे राहता. आम्ही अगदी सामान्य कुटुंबातील आहोत. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याचा कोणीही गॉडफादर नव्हता आणि आताही  आताही आमच्या जवळचे कोणीही नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की या प्रकरणाची त्वरित दखल घ्यावी आणि सर्व काही योग्य प्रकारे होईल याकडे लक्ष द्यावे अशी विनंती तिने केली आहे. या घटनेतील पुराव्यांच्या बाबतीत कुठलीही छेडछाड होऊ नये असे म्हणत तिने न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.   

अधिक वाचा  सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाला आता 'अंडरवर्ल्ड कनेक्शन'

 याशिवाय श्वेताने ट्विटरवर पंतप्रधानांना टॅग करत म्हटले आहे की, ‘मी सुशांतसिंग राजपूतची बहीण आहे आणि संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची विनंती मी आपल्याला करते आहे. आम्ही न्यायालयीन प्रणालीवर विश्वास ठेवतो आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही न्यायाची अपेक्षा करतो. #JusticeForSushant #SatyamevaJayat’

सुशांतच्या निधनानंतर श्वेता सोशल मीडियावर तिच्या भावाशी संबंधित बर्‍याच आठवणीही शेअर करत आहे. यापूर्वी श्वेताने एक व्हाईट बोर्ड दाखवत एक पोस्ट शेअर केली होती. २९  जूनपासून सुशांत आपला दिवस कसा सुरू करणार आहे याची संपूर्ण योजना त्या बोर्डवर लिहिलेली होती.

 २९ जूनपासून सुशांतसिंग राजपूत याच्या दैनंदिनी बाबत तिने लिहिले की तो सकाळी लवकर उठून आपले बेड आवरणे, चित्रपट आणि मालिका बघणे,  गिटार शिकणे, व्यायाम आणि मेडीटेशन करणे,   आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे आणि स्वच्छ ठेवणे,  सर्व गोष्टी आठवून पुन्हा पुन्हा सराव करणे, या गोष्टी या बोर्डवर लिहिल्या होत्या. ‘ श्वेतासिंग कीर्ती यांनी हा फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘भाईचा व्हाइट बोर्ड आहे त्यानुसार 29 जूनपासून वर्कआउट करणे आणि मेडीटेशनला सुरुवात करण्याची त्याने योजना तयार केली होती. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love