‘मी पुन्हा येईन’ असे म्हणण्यात घमेंड नाही तर आत्मविश्वास –नारायण राणे


मुंबई- सत्तेचा दर्प चालत नाही, असे शरद पवार म्हणत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस हे शांत स्वभावाचे आहेत आणि मी पुन्हा येईन, या त्यांच्या म्हणण्यात घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे असे सांगत भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. सामनात छापून आलेल्या या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपा व देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता टीका केली होती. विशेषतः फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या विधानावरही पवार यांनी भाष्य केलं होतं. यावर भाजपाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ”मी पुन्हा येईन. यात घमेंड गर्व नाही, तर हे आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी वाक्य आहे. मी ५ वर्षे यशस्वी काम केलं. त्यामुळे लोक मला निवडून देणार, तो विश्वास देवेंद्र फडणवीसांनी त्यातून व्यक्त केला. मग शरद पवार यांना असं का दिसावं? असा सवाल उपस्थितीत  केला

अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-2)

सामनातील शरद पवार यांच्या मुलाखतीचा समाचार घेताना नारायण राणे पुढे म्हणाले कि, “मुलाखतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभूत करतात, हे कोणाला उद्देशून होतं. नाव का नाही घेतं. पण हे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आहे. फडणवीस हे घमेंड करणारे, गर्व करणारे व्यक्ती नाहीत. सत्तेवर असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाची मस्ती आली, असं एकही उदाहरण कुणी सांगू शकत नाही असं दावा नारायण राणेंनी येवेळी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love