gtag('js', new Date());
  • Home
  • पुणे-मुंबई
  • सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री देशमुख यांनी फेटाळली
Image

सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री देशमुख यांनी फेटाळली

Spread the love

सुशांतच्या चाहत्यांची सीबीआय चौकशीसाठी मोहीम

मुंबई— अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी सोशल मीडियावर एक मोहीम सुरु केली आहे. सिनेमा आणि राजकारणातील अनेक सेलिब्रिटींनीही सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  अनिल देशमुख म्हणाले की, सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची गरज नाही. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत. सीबीआय चौकशीची मागणी मान्य करण्यात आलेली नाही.

देशमुख म्हणाले की, ‘मलाही सोशल मिडीयावरील या मोहिमेचे अनेक ट्वीट्स आले आहेत. परंतु मला सुशांतच्या मृत्यूची  सीबीआय चौकशीची आवश्यकता वाटत नाही. मुंबई पोलिस या प्रकरणाचा योग्य तपास करून चढा लावतील. मुंबई पोलिस सर्व मार्गाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास पूर्ण होताच, त्याच्या अंतिम अहवालाची तपशीलवार माहिती एकत्रित केली जाईल

अधिक वाचा  सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा

यापूर्वी बिहारचे माजी खासदार पप्पू यादव, अभिनेते शेखर सुमन, रूपा गांगुली आणि भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील सुशांतचे चाहते देखील सीबीआय चौकशीसाठी सरकारकडे विनंती करत आहेत.

दरम्यान, गुरुवारी सुशांतसिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनी गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून टॅग करून मदत मागितली. रिया चक्रवर्ती हिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,  ‘आदरणीय अमित शाह सर, मी रिया चक्रवर्ती, सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण आहे. सुशांतच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे, तथापि न्यायाच्या हितासाठी, मी तुम्हाला विनंती करते की या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. सुशांतला हे पाऊल उचलण्यासाठी कोणी  दबाव आणला हे मला फक्त जाणून घ्यायचे आहे. …रिया चक्रवर्ती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

राज ठाकरे यांचा घणाघात : “जिथे जमीन भुसभुशीत तिथेच घुशी शिरतात” :

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— स्वतःच्या राज्यात सुधारणा न करणाऱ्या ‘भैय्यांना’ इथे मराठी शिकवून काय साध्य होणार?, असा सवाल…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

राज्य सरकारच्या नवीन सौर धोरणामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले; ८ लाख रुपयांचा दरमहा फटका आणि स्थलांतराची भीती

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)– राज्य सरकारने आणलेल्या नवीन सोलर धोरणातील ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

आम्ही पुणेकर आणि काफिला फाऊंडेशनतर्फे काश्मीरच्या दुर्गम भागात मानवतावादी मदत मोहीम; शैक्षणिक व वैद्यकीय साहित्याचे वाटप

Spread the love

Spread the love पुणे: राष्ट्रीयएकात्मता, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत ‘आम्ही पुणेकर’  आणि काफिला फाऊंडेशन (जम्मू-काश्मीर) यांच्या…


Spread the love
ByByNews24Pune Apr 28, 2026

सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री देशमुख यांनी फेटाळली

by News24Pune time to read: <1 min
0