कारगिल युध्द : भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम – पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— कारगिल विजय दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धातील भारतीय  शहीद  जवानांच्या बलिदानाची आठवण करताना, कारगिलचे युध्द म्हणजे भारताच्या मित्रत्वाच्या बदल्यात पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम होता, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी या युद्धात शहीद झालेल्या जावांनाचे नमन केले.

आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातील 67 व्या भागामध्ये पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाकिस्तानने मोठमोठ्या धाडसी योजना आखून  भारताची जमीन हस्तगत करण्याच्या आणि आपल्या देशांतर्गत कलहापासून लक्ष इतरत्र हटविण्यासाठी हे दुस्साहस केले होते.

ते म्हणाले, ‘आजचा 26 जुलै हा दिवस खूप खास आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. आज 21 वर्षांपूर्वी आमच्या सैन्याने कारगिल युद्धामध्ये भारताच्या विजयाचा झेंडा फडकावला. ते म्हणाले की, कारगिल युद्ध ज्या परिस्थितीत घडले त्या परिस्थितीला भारत कधीही विसरू शकत नाही.

पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानने भारताची जमीन हस्तगत करण्यासाठी आणि त्यांच्या  देशांतर्गत  कलाहापासून इतरत्र लक्ष वळविण्यासाठी हे दुस्साहस केले होते तर भारत पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवण्याच्या प्रयत्नात होता. ते म्हणाले की, काही लोक अश्या स्वभावाचे असतात की जो कोणी त्याच्या हिताचा विचार करतात त्यांच्याही नुकसानानीचाच ते विचार करतात. म्हणूनच भारताच्या मैत्रीच्या बदल्यात पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला होता. 

 परंतु त्यानंतर,  या युद्धामध्ये भारताच्या वीर जवानांनी जे शौर्य आणि ताकद दाखविली ती संपूर्ण जगाने पहिली.  पंतप्रधान म्हणाले,  आपणा कल्पना करू शकतो की, ‘उंच पर्वतांवर बसलेला आपला शत्रू आणि खाली लढणारे आमचे सैन्य, वीर जवान अशी परिस्थिती होती. परंतु विजय पर्वतांच्या उंचीचा नाही तर भारताच्या सैन्याच्या धैर्याचा आणि खऱ्या पराक्रमाचा झाला.  

देशाच्या रक्षणासाठी समर्पित नायकांचा भारताल गर्व आहे-  शाह

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,  देशाच्या रक्षणासाठी समर्पित नायकांचा देशाला नेहेमीच गर्व आहे. याच शूर वीरांनी देशाच्या संरक्षणाप्रती समर्पित असलेल्या आणि कारगिलच्या दुर्गम टेकड्यांमधून शत्रूला पिटाळून लावले होते.  शाह म्हणाले की, कारगिल विजय दिन हा भारताचा स्वाभिमान, विलक्षण पराक्रम आणि स्थिर नेतृत्व याचे प्रतिक आहे.   

शहा यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘मी त्या शूर जवानांना सलाम करतो ज्यांनी आपल्या अदम्य धैर्याने कारगिलच्या दुर्गम डोंगरांमधून पिटाळून लावले आणि पुन्हा त्याठिकाणी भारताचा तिरंगा फडकाविला.  मातृभूमीच्या रक्षणासाठी समर्पित असणाऱ्या त्या वीर जवानांचा देशाला अभिमान आहे.’

जर शत्रूंनी हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊ- राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या शूर सैनिकांना नमन करत, कारगिल विजय दिवस हा फक्त एक दिवस नव्हे तर भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा विजयोत्सव आहे, अशा भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेसाठी उचललेले प्रत्येक पाऊल हे आत्मसंरक्षणासाठी असते नव्हे की ते आक्रमणासाठी असते. जर शत्रू देशाने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही त्याला कारगिलसारखे चोख प्रत्युत्तर देऊ.

पत्रकारांशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “कारगिल विजय दिनानिमित्त मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. कारगिल युद्धात विजय मिळवून देणारे भारतीय सैन्याच्या जवानांचे वीर मरण कायम आमच्यासाठी प्रेरणादायक असेल.

ते म्हणाले की कारगिल हे केवळ आपल्या स्वाभिमानाचे प्रतीकच नाही तर अन्यायाविरूद्ध उचललेले एक पाऊलदेखील आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत  आपण जे काही करतो ते कोणावरच्या हल्ल्यासाठी नव्हे तर आत्मरक्षासाठी असते.

राजनाथ सिंह म्हणाले की, माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी असेही म्हटले होते की, कारीगीलच्या युद्धात आमच्या जवानांनी जो पराक्रम केला त्यावरून आम्ही आमच्या शत्रू राष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देऊ शकतो हे सिध्द केले आहे.  आमची 21 वर्षांनंतरही तीच भावना आजही कायम आहे. आम्ही शांतताप्रेमी राष्ट्र आहोत. आम्ही आमच्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी कोणतीही पावले उचलण्यास सदैव तत्पर आहोत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *