उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका- प्रकाश आंबेडकर; संपूर्ण लॉकडाऊन न उठवल्यास १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

महत्वाच्या बातम्या राजकारण
Spread the love

उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका- प्रकाश आंबेडकर; संपूर्ण लॉकडाऊन न उठवल्यास १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://news24pune.com/?p=922

पुणे – जातीचा नेता होऊ शकतो,धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढंच म्हणणं आहे की निर्णय घ्यायला शिका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.दरम्यान, कोविड, कोविड करण्यापेक्षा राज्य सरकार संपूर्ण लॉकडाऊन कधी उघडणार हे सांगावे अन्यथा कायदा १० ऑगस्ट नंतर आम्ही कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरू असा इशाराही आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला.

लॉकडाऊनच्या बाबतीत निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना राजकीय अडचण येते का असे विचारले असता आंबेडकर  म्हणाले, उद्धव ठाकरे यांना एवढंच म्हणणं आहे की निर्णय घ्यायला शिका राम मंदिरावर  बोलण्यास मात्र, त्यांनी ‘नो कॉमेंट्स’ म्हणून उत्तर दिले.

आंबेडकर म्हणाले, आम्ही वंचितांचे नेतृत्व करतो आहोत. लॉकडाऊनमुळे जनतेचे हाल होत आहेत.  राज्यात दुकानांसाठी सुरु केलेला सम-विषम तारखेचा नियम कधी बंद करणार?, टपरीवाले आणि फेरीवाले यांची उपासमार होत आहे त्यांना दुकाने उघडण्याची परवानगी कधी देणार?, एस.टी. महामंडळाच्या १० हजार कर्मचाऱ्यांना काढणार आहेत त्यांना दोन महिन्याचे पगार नाहीत, एस. टी. रस्त्यावर कधी धावणार?, मनपाची सार्वजनिक वाहतूक कधी सुरु होणार, हे सर्व सरकारने सांगावे, हे जर सरकार सांगणार नसेल तर वंचित बहुजन विकास आघाडी १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. अशा हॉटस्पॉटच्या ठिकाणी सन २०१९ च्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत यंदा २०२० साली याच तीन महिन्यात एकूण मृत्यू कमी झाले आहेत. ही केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची आकडेवारी आहे. कोरोनाच्या काळातील मृत्युदरही ३ टक्यांपेक्षा कमी आहे. असे असताना सरकार केवळ अमेरिका, इंग्लंड करते म्हणून ‘कॉपी कॅट’ (अनुकरण) करत आहे.  

 लोकांचे हाल होत आहेत, जुलै महिन्यात हवामान विभागाने १५ दिवस सलग पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.  कृष्ण, गोदावरी वैनगंगा या खोऱ्यातील धरणे ४०-७० टक्के भरले आहे, पुराचा प्रश्न निर्माण होणार आहे,  मुंबईमध्ये ४ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा निर्माण होणार आहेत. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी वाहून जाण्याचे स्त्रोत बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  इमारतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारने कोवीड, कोवीड  करण्याऐवजी पुराचे नियोजन काय केले आहे ते सांगावे. मुंबईत झोपडपट्टीत आणि इमारतीत पाणी घुसेल, मात्र सरकार याबाबत गंभीर नाही अशी टीका त्यांनी केली.

 सरकारने नक्की कधी काय सुरु करणार याचे फिक्स टाईम टेबल सांगावं,  हे सर्व राम भारोसे सुरु आहे, सरकार सरकारी पातळीवर का निर्णय घेत नाही, कलेक्टर निर्णय घेतात हे पूर्ण चुकीचं आहे, सरकारनं या बाबत निर्णय घ्यावा, राज्य सरकार आणि केंद्र चालढकल करत आहेत, निर्णय घेण्याची शमता नसल्यानं आर्थिक फटका बसत आहे. याबाबत सरकारने सांगावे अन्यथा  दहा ऑगस्ट नंतर आम्ही रस्त्यावर उतरून कधी ही कायदा हातात घेऊ, असा इशारा आंबेडकर यांनी दिला.

 मुंबईत बेस्ट मोठा संख्येने सुरु कराव्यात, बस थांब्यावर लोकांना २ तास बसची वात पाहत थांबावी लागते. जर १५ बसेस धावतात १० बस धावायला काय प्रॉब्लेम आहे? मोबाईल ट्यूनवरून अनलॉक झाल्याचे सांगण्यापेक्षा अनलॉकची अंमलबजावणी सरकारने  प्रत्यक्ष सुरु करावी असे ते म्हणाले. सर्व गोष्टींचा निर्णय सरकारनेच घेण्यापेक्षा काही निर्णय  जनतेवर सोडावे अशी सुच्नाहे त्यांनी केली.

आंबेडकर पुढे म्हणाले, जगभर चर्चा सुरु होती फार मोठी लागण होईल म्हणून. मात्र, ८०उरलेल्या १५ टक्के लॉक उपचाराने बरे होत आहेत. केवळ  5 टक्के लोकांना लागण होण्याची शक्यता आहे. मग ५ टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीस का धरता? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी याचे उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

 मंत्र्यांना कायदा माहिती नाही

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत जो गोंधळ सुरु आहे त्याबाबत विचारले असता आंबेडकर म्हणाले, परीक्षा घेण्याचा अधिकार युजीसीचा आहे, सरकारचा नाही. म्नात्र्यांना कायदा माहिती नाही असा टोला त्यांनी लगावला. कोरोनाचा बावू कशाला पाहिजे? असा सवाल करत परीक्षेशिवाय पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमापात्रावर हा कोविडमुळे उत्तीर्ण झाला असा शेरा येणार असेल तर त्या प्रमाणपत्राचा उपयोग काय? विचार न केल्यामुळे एका पिढीचे आयुष्य परीक्षा घेतल्या नाहीतर बरबाद होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कारण असे झाल्यास मेरीट आणि स्टेटस नसल्याने त्यांना नोकरीसाठी कोणी उभे करणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच आम्ही लागल्यास परीक्षा पुढच्या वर्षी देऊ पण ती आमच्या मेरीटवर देऊ असे सांगावे अशी सूचना त्यांनी केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *