अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार कोरोनावरची लस; किती असेल किंमत?

महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय
Spread the love

अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार कोरोनावरची लस; किती असेल किंमत?https://news24pune.com/?p=927

पुणे–कोरोनाचे वाढत्या संकटामुळे कोरोनावर कधी लस येणार या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील विविध लस बनविण्यासाठी जग प्रसिद्ध असलेली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ऑक्सफर्डच्या मदतीने सर्वात आधी लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, ही लस आली तरी त्याची काय किंमत असणार याबाबतही विविध वृत्त येत आहे. अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार असल्याचे सिरम इन्स्टिट्युटने कळवले आहे.

सिरम ही संस्था,Global Alliance for Vaccines and Immunization (GIVE) ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल.

करोना संकटातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे त्यावरची लस. ही लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे.  

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. जगातली एक उत्तम संस्था असा या संस्थेचा लौकिक आहे. जगभरात सध्या करोनावरच्या अनेक लसींवर काम सुरु आहे. यापैकी काही लसी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. सिरमनेही ऑक्सफर्ड आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसोबत लसींसंदर्भातला करार केला आहे. यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्याला संमती मिळाली तर सिरम इन्स्टिट्युला लस उत्पादनासाठी निधी मिळणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *