स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग- १२ |  हिंदू समाजाच्या ठाम भूमिकेमुळे हनुमानगढी मंदिर वाचले  

Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

Amir Ali  | Attack On Ayodhya : शाह गुलाम हुसेन (Shah Ghulam Hussain) याचे आक्रमण परतवल्यानंतर अयोध्येतील(Ayodhya)  संघर्ष शांत झाला असे वाटत असतानाच ऑक्टोबर १८५५ मध्ये अमेठीच्या(Amethi) अमीर अली(Amir Ali) नामक एका मौलवीने(Cleric) हनुमानगढीचे मंदिर ( Hanumangarhi  Temple) मशिदीच्या(Mosque) जागेवर बांधलेले आहे या मुद्द्यावर जिहादची ( Jihad) हाक दिली आणि सुमारे आठशे सशस्त्र सैनिकांना घेऊन त्याने अयोध्येवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली. (The Hanumangarhi temple was saved due to the strong stand of the Hindu community)

याप्रसंगी अवधवर म्हणजेच अयोध्येवर राज्य करणाऱ्या वाजिद अली शाहने व अवधच्या दरबारातील ईस्ट इंडिया कंपनीचा (East India Company)  रेसिडेंट कर्नल डब्ल्यू. एच. स्लीमन (Colonel W. H. Sleeman)  याने अमीर अलीला(Amir Ali)  समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नावाने मक्केला(Makka)  मोठी देणगी देणे, अमीर अलीला मानाचा सरोपा देणे अशा गोष्टी देखील करण्याची भूमिका वाजिद अलीने घेतली, अमीर अलीने मात्र या गोष्टीला नकार देऊन अयोध्येकडे सशस्त्र चाल सुरू केली. अयोध्या व परिसरातील हिंदू समाज जागृत झाल्यामुळेच अयोध्येवर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकाला तसेच ख्रिश्चन असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वाला देखील हिंदू समाजाची बाजू घेण्याची भूमिका घ्यावी लागली, इतिहासातील या घटनेचा बोध घेऊन हिंदू समाजाने संघटित व्हायला हवे हे लक्षात घेतले पाहिजे.

अधिक वाचा  मोहोळांची प्रचारात आघाडी : विविध क्षेत्रातून मिळतोय उत्स्फूर्त पाठींबा

अयोध्येवर चाल करण्यासाठी निघालेल्या जिहादी फौजेला रोखण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने चढाई करण्याची भूमिका घेतली. अखेर या लढाईत अमीर अली व त्याचे सर्व साथीदार मारले गेले. हा संघर्ष पुढच्या काळात चिघळू नये,आणखी कोणी जिहादी या संघर्षासाठी तयार होऊ नये व आपल्या राज्यात अशांतता निर्माण होऊ नये म्हणून हिंदू समाजाने माघार घ्यावी असे अयोध्येतील शासक वाजिद अली याला वाटत होते त्यामुळे त्याने हिंदू समाजाला समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु, “राजाची इच्छा असेल तर मी भगवंताच्या मूर्ती घेऊन निघून जातो, तुम्ही हवे ते करा.” असे उत्तर जेव्हा पुजाऱ्याकडून मिळाले, तेव्हा वाजिद अलीने हा विषय वाढवला नाही.

हिंदू समाजाची बाजू न्यायाची होती, तो धर्माने वागत होता व अन्याय सहन न करता आपल्या भूमिकेवर ठाम राहिला, त्यामुळेच हनुमानगढीचे मंदिर वाचले व पुढच्या अनेक संघर्षात तेच मंदिर रामभक्तांसाठी प्रेरणास्थान ठरले. अनेक प्रकारांनी अयोध्येतील हा संघर्ष सुरूच राहिला, हिंदू समाजाने देखील सातत्याने या संघर्षाचा प्रतिकार केला. अशा ताण-तणावात वर्षानुवर्षे सरली, परंतु अयोध्येचा संघर्ष काही संपला नाही.

अधिक वाचा  अफजलखान वधाचा देखावा सादर करण्यास गणेश मंडळाला परवानगी नाकारली

डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love