रविवारी दिवसभर मटणाच्या दुकानांसहीत सर्व दुकाने उघडी राहणार


पुणे —पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दि. १३ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या १० दिवसांच्या लॉकडाऊनचा पहिला टप्पा शनिवारी पूर्ण झाला आहे. पहिले पाच दिवस कडक लॉकडाऊन होता. औषधे आणि दुध वगळता इतर जीवनावश्यक गोष्टींचीही दुकाने बंद होती. दुसऱ्या, टप्प्यात मात्र नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. पाच दिवस दुकाने बंद असल्यामुळे आणि रविवारी गटारी आमावस्या असल्याने नागरिकांची खरेदीसाठी एकदम गर्दी होऊ नये म्हणून रविवारी मटणासहित सर्व दुकाने सकाळी ८ ते संध्याकाळी सहा पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर सोमवार पासून २३ तारखेपर्यंत ही दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत उघडी राहतील अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

अधिक वाचा  संयुक्ता धुलुगडे ही यंदाची मिस पुणे फेस्टिव्हल

 याबाबत मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात विचारविनीमय सुरु होता. त्यानंतर ही शिथिलता देण्यात आली.  नियमांचे पालन करुन हळूहळू शिथिलता देण्यात येईल, असं आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं.  

पिंपरी चिंचवडमध्येही शिथीलता देण्यात आली असून रविवारी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी किराणा माल, भाजी विक्रेते आणि मटण-चिकन-मासे-अंडी विक्रेत्यांना विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जाहीर केलेला १० दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. पुणे शहरात मंगळवार १४ जुलै मध्यरात्री एक वाजता सुरु झालेला लॉकडाऊन २३ जुलैपर्यंत कायम असेल. पुणे शहरातील रस्ते, पेठांचे भाग पोलिसांनी बंद केले असून लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.  

हिंदू खाटिक समाजाची मागणी मान्य

अधिक वाचा  चक्क कुरिअरने तलवारी आल्याने खळबळ

दरम्यान, रविवारी गटारी अमावस्या असल्याने आणि सोमवारी सोमवती असल्याने दिनक १९ आणि २० जुलै रोजी दुकानांची वेळ वाढवून मिळावी अशी मागणी अखिल भारतीय हिंदू खाटिक समाजाने केली होती. त्यांची मागणी यानिमिताने पूर्ण झाली असून रविवारी आखाडाचा शेवटचा दिवस असल्याने काही प्रमाणात व्यवसायाचे नुकसान भरून निघेल असे अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज पुण्याचे उपाध्यक्ष शिवाजी कोथमिरे यांनी सांगितले. पुढे गणपती, नवरात्र असे सण आहेत. त्यामुळे दुकाने उघडली तरी व्यवसायावर परिणाम होणार आहे. सोमवारी सुद्धा दिवसभर मटणाची दुकाने पूर्ण दिवस उघडी ठेवण्यास परवानगी शासनाने द्यायला पाहिजे. रविवारी पूर्ण दिवस परवानगी दिल्याबद्दल कोथमिरे यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

2 प्रतिक्रिया

  1. मा.पुणे आयुक्तांनी खाटीक बांधवांचा विचार करून मटण व्यवसायिकांना सहकार्य केलेल्या बद्दल खूप खूप आभार, तसेच ही मागणी करण्यासाठी आमचे सहकारी श्री शिवाजी काका कोथमिरे यांनी मोलाचे प्रयत्न केले त्यांचे ही मनःपूर्वक धन्यवाद …!!!

    सरचिटणीस,
    श्री. कपिल प्रदिप घोलप.
    युवा प्रकोष्ट – महाराष्ट्र प्रदेश

Comments are closed.