माझेही करिअर संपवण्याचा प्रयत्न झाला होता- सिमी गरेवाल, कंगना रनौतचे केले समर्थन


ऑनलाईनटीम- अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादविवाद सुरु आहे. नेपोटिज्म सारख्या मुद्द्यांवरून दोन गट पडले असून त्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.  अभिनेत्री कंगना रनौतने तर या वादामध्ये उघडपणे भूमिका घेऊन उडी घेतली आहे. “बॉलीवूडमध्ये अशी एक टोळी आहे, जिच्या इशाऱ्यावर इथे सर्व काही चालते”,असा जाहीर आरोप तीने केला आहे. कंगनाच्या भूमिकेचे  आता प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवालने समर्थन केले असून तिने सोशल मिडीयावर कंगणाचे उघडपणे कौतुक केले आहे.

सिमीने ट्विटरवर म्हटले आहे की, मी कंगणाचे कौतुक करते, जी ‘माझ्यापेक्षा खूप धाडसी आणि शूर आहे.   सिमीने आपल्या ट्विटमध्ये तिच्यावर ओढवलेला प्रसंगही सांगितला आहे. एका ‘सामर्थ्यवान’ माणसाने माझी कारकीर्द कशी खराब करण्याचा प्रयत्न केला हे फक्त मला माहित आहे. मी गप्प बसले कारण, मी इतकी शूर नाही … मी निराश आहे परंतु, कंगनाला पाहून मला दिलासा मिळाला आहे ‘

अधिक वाचा  करीनाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म:सोशल मिडियावर 'औरंगजेब' असे नामकरण

सिमीने पुढे लिहिले आहे की, ‘कंगनाची मुलाखत पाहिल्यानंतर तुम्हाला कसे वाटले हे मला माहिती नाही परंतु, मी खूप निराश झाले. सुशांतसिंग राजपूतने काय सहन केले आणि बॉलिवूडमध्ये अनेक ‘बाहेरील’ लोकांना कसा सामना करावा लागत आहे हे समजल्यावर मला खूप त्रास झाला आहे. हे बदलले पाहिजे. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येमुळे तेथे जागरूकता निर्माण झाली. त्याचप्रमाणे कदाचित सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानेही बॉलिवूडमध्ये बदल घडून येईल.’ अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.

कंगना एका मुलाखतीत म्हणाली होती की, जर मी असे काही सांगितले ज्याचा पुरावा मी देऊ शकत नाही किंवा  जे मी सिद्ध करु शकत नाही परंतु, जे लोकांच्या हिताचे नाही, तर मी माझे पद्मश्री परत करीन. असे असेल तर  मी या सन्मानास पात्र नाही. मी असं कधीच म्हटले नव्हते की कुणाला सुशांतचा मृत्यू व्हावा अशी इच्छा होती पण बर्‍याच जणांना तो पूर्णपणे बर्बाद व्हावा असे वाटत होते. ज्या लोकांचे मन गिधाडाचे असते ते लोक इतरांचे मरण पाहू इच्छितात.   

अधिक वाचा  आरोग्यदायी लोणची बनवा घरच्या घरी

बॉलीवूडमध्ये नेपोटिजमवर खुलेपणाने बोलणाऱ्यांपैकी अभिनेत्री कंगना रनौत आहे.  सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचे वर्णन तीने खून असे केले होते. व्हिडिओमध्ये कंगना म्हणते, ‘सुशांतसिंग राजपूत याच्या हत्येनंतर बर्‍याच गोष्टी समोर आल्या आहेत. मी काही मुलाखती वाचल्या आहेत आणि काही लोकांशी चर्चा केली आहे. त्याचे वडील म्हणतात की चित्रपटसृष्टीतील तणावामुळे सुशांत खूप चिंतीत होता.   

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love