अजित पवारांना अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे


पुणे—उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी मुंबईत जास्त न थांबता पुण्यामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा असे सांगतानाच अजित पवार यांना अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

पुण्यामध्ये ते पत्र्कारांशे बोलत होते.

पाटील  म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत स्वत: आढावा बैठक घेतली पाहिजे. बैठक घेताना त्यांनी कद्रूपणा न करता विरोधी पक्षांच्या आमदारांनाही या बैठकीला बोलावले पाहिजे.

नजीकच्या काळात पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आपण सर्वजण मिळून हे खोटे ठरवू या, त्यामध्ये सरकारची मोठी भूमिका राहील असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  पवारांनी शेताच्या बांधातच रहावं; शेजारचा देवाचा बांध रेटू नये- माधव भांडारी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सामनातील गाजलेल्या मुलाखतीनंतर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे याविषयी बोलताना पाटील म्हणाले, ही मुलाखत म्हणजे निव्वळ मॅच फिक्सिंग आहे. चार महिन्यानंतर मुख्यमंत्री मीडियासमोर आले आणि तेही सामनासमोर आले, असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत प्रश्न विचारणार आणि त्याला मुख्यमंत्री उत्तरे देणार. तुमचे केस वाढले… असले प्रश्न विचारणार राऊत त्यांना विचारणार कारण राऊत हे स्तुतीपाठक आहेत. त्यांनी मुलाखत घेण्याऐवजी इतरांनी घ्यायला हवी.  

सध्या राज्यात तीन पक्षाचा शो सुरू आहे. उत्तम शो आहे. त्यांना हा शो करण्याचं स्वातंत्र्य आहे. अशोक चव्हाण यांनी आधी रागवायचं आणि माझं काही म्हणणंच नाही, असं दुसऱ्या दिवशी सांगायचं. ठिक आहे. तुमचं काही म्हणणं नाही, तर आमचंही काही म्हणणं नाही, असंही ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love