पुण्यातील खूनसत्र सुरूच : मोक्कातील गुंडांकडून तरुणावर वार करून खून : तीन दिवसांत तीन खून

Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up
Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up

पुणे(प्रतिनिधी)- पुणे शहरात गेल्या तीन दिवसात तीन खून झाले असून, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर मध्यरात्री गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात मोक्कातून जामिनावर बाहेर आलेल्या गुंडांनी तरुणावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भावाला वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

सुनील सरोदे (वय 20, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोक्कातून जामिनावर सुटलेल्या रोहन कांबळे, साहिल कांबळे आणि साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे. स्वारगेट पोलिसांनी रोहन कांबळे, साहिल कांबळे, शिवशरण धेंडे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे.

हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुनील सरोदे हा डायस प्लॉट येथे राहतो. त्याचा भाऊ आणि आरोपीची भांडणे झाली होती. साहिल कांबळे याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याची जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून साहिल कांबळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार होती. कारवाईपूर्वी त्याने डायस प्लॉट परिसरात मध्यरात्री दहशत माजविली. रोहन कांबळे, साहिल कांबळे हे साथीदारासह सुनील सरोदे याला मारण्यासाठी डायस प्लॉट परिसरात आले होते. ते भावाला मारत असताना सुनील सरोदे हा त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडला. तेव्हा सुनील याच्या मानेवर चाकूचा वार करण्यात आला. मानेची नस तुटल्याने मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पाच जणांना अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #drug trafficking : ड्रग्ज तस्करीचे लंडन कनेक्शन उघड : तब्बल साडेतीन हजार कोटींहून अधिक किंमतीचे मेफेड्रॉन जप्त.