पुणे- कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवड चा वर्धापन दिवस कार्यक्रम जगदगुरू तुकाराम महाराज यांचे थेट 10 वे वंशज ह. भ. प. श्री शिवाजीराव सदाशिव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरण आणि उत्साहात दिनांक 01.09.2024 रोजी उद्यान मंगल कार्यालय सदाशिव पेठ पुणे येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संतोष कृष्णा मोरे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. समाजातील वर्षभरात दिवंगत समाज बांधव याना श्रध्दांजली सामुदायिक वाहण्यात आली. त्यानंतर सुरुवातील प्रमुख पाहुणे यांनी मनोगत व्यक्त केले मुख्यतः समाज एकसंघ कसा राहील या बाबत मार्गदर्शन केले. वृक्षवल्ली आणि कोकण प्रांताचे नाते काय आहे त्याबाबत खूप उदाहरणे देऊन ते समजावून दिले. त्यानंतर समाजातील जेष्ठ मान्यवर, उद्योजक, शिक्षक, खेळाडू, सैनिक व पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1.श्री. गजानन भिवाजी सकपाळ (सामाजिक क्षेत्र )
2.श्री. प्रकाश भिकाजी मोरे (सामाजिक क्षेत्र )
3.श्री. कृष्णा भागोजी मोरे (सामाजिक क्षेत्र )
4.श्री. मनोहर गोविंद यादव (सामाजिक क्षेत्र )
5.श्री. भगवान श्रीराम उत्तेकर (सैनिक पुरस्कार )
6.श्री. अनिल दत्ताराम सकपाळ (क्रिडा क्षेत्र )
7.सौ.अर्चना आनंद चव्हाण (शैक्षणिक पुरस्कार )
8.श्री. संजय गंगाराम शिंदे (कला क्षेत्र)
9.श्री. राम राघोबा उत्तेकर (उद्योग क्षेत्र )
10.रमेश कृष्णा जाधव (पोलीस क्षेत्र)
11.सौ. रेश्मा रमेश मोरे (संजीवनी पुरस्कार )
12.कु. मेघना महेंद्र सकपाळ (पहिली फायर वुमन पुरस्कार )
13.कु. अनुराग पांडुरंग जाधव (विशेष पुरस्कार)
14.कु. सायली हनुमान कदम (विशेष पुरस्कार)
पुरस्कार प्राप्त झालेल्या समाज बांधव यांच्या पैकी काहीनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संस्थेचे आभार मानले.
या कार्यक्रमाला खूप मोठा समुदाय उपस्थित होता. संस्थेचे आजीवन सभासद ह. भ. प. सदाशिव चव्हाण, रघुनाथ शिंदे, रामचंद्र मोरे, चंद्रकांत जाधव, मुकुंद जाधव, वसंत चव्हाण, मधुकर मोरे, तानाजी शिंदे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे मुख्य समन्वयक कृष्णा कदम, उपाध्यक्ष दत्ता जाधव, उपाध्यक्ष अनिल मोरे व इतर पदाधिकारी कार्याध्यक्ष राजेंद्र सोंडकर, सचिन मोरे, मंगेश शिंदे, संजय सकपाळ, कृष्णा जाधव, संदिप सावंत, अनिल मोरे, बाळासाहेब मोरे, भरत मोरे, रविंद्र मोरे, शंकर मोरे, नंदू चव्हाण, समीर हळदे, संतोष भोसले आणि संपर्क प्रमुख दत्ता मोरे (गुरुजी) आणि सर्व सभासद उपस्थित होते.
या सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, आणि सर्व सभासद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तसेच प्रसिद्धी प्रमुख सौ. सई सकपाळ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव रमेश मोरे आणि संदिप चव्हाण विभागीय अध्यक्ष यांनी केले.