पुणे – काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह अंतर्गत व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गट सन्मान सोहळा, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात ३५० महिलांनी सहभाग घेतला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष यांच्या वतीने झालेल्या या सोहळ्यात सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे संयोजक, माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन बचत गटाच्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी महिलांना व्यवसायाच्या भांडवल उभारणीसाठी तसेच मार्केटिंगसाठी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी माजी आमदार रवींद्र धंगेकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती पूजाताई पारगे, वैशालीताई थोपटे, रुपाली शेलार, सुरेखा मारणे, कोंग्रेसचे कोथरूड अध्यक्ष रवींद्र माझीरे, कानहु साळुंके, दिनेश सुतार, निलेश वाघमारे, बंटी जाधव आकाश देवकुळे, अप्पासाहेब कांबळे, हनुमंत राऊत, अब्दुल तांबोळी, चंद्रकांत जाधव, काळुराम कुदळे, इंद्रभान लांडगे, चेतन आगरवाल, किरण मारणे, हाजी शेख लियाकत शेख, अंकुश आडसुळ, लखन कुराडे, हंसराज गायकवाड, दिपक तांबे, प्रतीक कासार, धनंजय झुरुगे, बनसोडे दादा, शितल चव्हाण, पुजा चव्हाण, मिनल धनवटे, मनीषा भोसले, हौसा मारणे, ययाती चरवड, अंजली साठे आदी उपस्थित होते.
कंत्राटी कामगार मजदूर काँग्रेस पुणेचे शहराध्यक्ष किशोर मारणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खडकवासला मतदारसंघाच्या उपाध्यक्ष प्रियंकाताई तांबे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सिताराम तोंडे पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.