पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची महिलेची धमकी

pune airport
Woman threatens to blow up Pune airport with bombs

पुणे—दिल्लीच्या एका महिलेने पुणे विमानतळ (Pune Airport) बॉम्बने (Bomb) उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे विमानतळावर खळबळ उडाली. मात्र, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.(Woman threatens to blow up Pune airport with bombs)

नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी दीपाली बबनराव झावरे (रा. कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नीता प्रकाश कृपलानी ही महिला गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. त्यावेळी सुरक्षारक्षक महिलेची चौकशी करत असताना आरोपी महिलेने शरीराच्या चारही बाजूंनी बॉम्ब लावलेले असल्याचं सांगितलं. विमानतळावर आत जाण्यापूर्वी सुरू असलेल्या चौकशीला वेळ लागत असल्याने महिलेने सुरक्षारक्षकांना शरीराला बॉम्ब लावण्यात आल्याचं सांगितलं आहे. पुणे ते दिल्ली या विमानाने आरोपी महिला प्रवास करणार होती. पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करत तिची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.

अधिक वाचा  सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा

पोलीस कर्मचारी दीपाली झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिल्लीतील आरोपी महिलेवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर महिलेनं बॉम्ब असल्याचा केलेला दावा हा केवळ अफवा असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love