‘टिकटॉक स्टार’ समीर गायकवाडने का केली आत्महत्या?

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – हजारो फॉलोअर्स असलेला आणि अल्पावधीत  टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झालेला समीर गायकवाड (वय 22) याने रविवारी आपल्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. समीरच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबियांबरोबरच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, समीरने आत्महत्या करण्यापूर्वी कुठलीही ‘सुसाइड नोट’ लिहून न ठेवल्याने त्याच्या आत्महत्येचे गूढ वाढलेले असतानाच प्रेम संबंधातून हे पाऊलले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी समीर गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधून त्याने चाहत्यांना आवाहन केले आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. समीर याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरून लाईफ लाईन हॉस्पिटलला तातडीने नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे सांगितले. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर आले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही. म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समीर गायकवाड म्हणाला की, समोरच्यानं चहाचं दुकान टाकलं म्हणजे आपण ते नाही टाकायचं. तू दुधाचं टाक, त्याल्या दे. दोघे मिळून पुढे जा. पण नाही. आपल्याला तेच टाकायचं आहे. म्हणजे तो भिकारी आणि आपण कर्जबाजारी. अरे सुधरा खेकड्यांनो, असे त्याने आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

समीरने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडियावर समिरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे अनेक चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

यापूर्वी देखील देश-विदेशातील काही टिकटॉक स्टार्सनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जून २०२०मध्ये सिया कक्‍करने आत्महत्या केली होती. त्यानंतर अमेरिकन टिकटॉक स्टार डेझरिया क्विंट नोयाने देखील गेल्या आठवड्यात आत्महत्या केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *