पुणेकरांनी अनुभवला ‘बर्निंग बस’चा थरार: एकाचा दुर्दैवी मृत्यू


पुणे- पुणे शरातील खराडी भागात आज पुणेकरांना एक थरार बघायला मिळाला. खराडी बायपास चौकातून जात असलेल्या आणि प्रवासी असलेल्या एका धावत्या पीएमपीएल बसने अचानकच पेट घेतल्याने रहदारी असलेल्या या रस्त्यावर काही काळ ‘बर्निंग बस’च्या थराराणे खळबळ उडाली होती. एका दुचकीची आणि या बसची धडक होवून घर्षणाने बसने पेट घेतल्याचे सांगण्यात आले. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली.  दरम्यान, या घटनेत बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, दुचाकीस्वार बसखाली अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अजिंक्य येवले(वय 26)असे या तरुणाचे नाव आहे.

नगर रस्त्यावरील खराडी दर्गा येथील बालाजी हॉस्पिटल समोर आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास पी एम पी एम एल बस आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेमुळे झालेल्या घर्षणातून पी एम पी एम एल बसने पेट घेतला. सीएनजी वर चालणारी बसल्यामुळे बस जळून खाक झाली. बसमधील प्रवासी वेळ उतरल्याने त्यांच्यापैकी कुणीही जखमी झाले नाही. मात्र बस खाली अडकल्याने दुचाकीस्वाराचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. : 31 हजार महिलांच्या मुखातून उमटले अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर