तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका-प्रकाश आंबेडकर

Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

मुंबई– ‘एक राजा बिनडोक आहे’, असे मी म्हणेन आणि दुसरे संभाजीराजे यांनी भूमिका घेतली आहे परंतु, ते आरक्षणापेक्षा इतसर गोष्टींवर भर देत आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर दोन्ही छत्रपतींचे समर्थक आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. दरम्यान,’सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली. त्याचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याविरोधात बोलल्यास तुम्हाला बघून घेऊ, असे शिवसेनेच्या मुखपत्रात सांगितले जात आहे.  तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका. तसे असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी येतो, असे जाहीर आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  एक राजा बिनडोक तर दुसऱ्याचे राजाचे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर-प्रकाश आंबेडकर

प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर  यांनी शिवसेना आणि  सामनावर टीका करत मुळात ‘सामना’ या सगळ्या प्रकरणात का भूमिका घेत आहे, तेच मला समजत नाही असे वक्तव्य केले.

दरम्यान, सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरू  असलेले शह- काटशहाचे राजकारण आणि केंद्राने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकार करत असलेला विरोध यावरून बिहारच्या निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपति राजवट लागू केली जाईल असे भाकीत आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट?

केंद्रा सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास अशाप्रकारे विरोध करणें म्हणजे एक प्रकारची बंडखोरी आहे. भारतीय घटनेने आशाप्रकारे बंडखोरी करण्याचा अधिकार राज्यांना दिलेला नाही. एकदा केंद्र सरकारने कायदा मंजूर केला की त्या मुंबई- ‘एक राजा बिनडोक आहे’, असे मी म्हणेन आणि दुसरे संभाजीराजे यांनी भूमिका घेतली आहे परंतु, ते आरक्षणापेक्षा इतसर गोष्टींवर भर देत आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर दोन्ही छत्रपतींचे संरथक आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. दरम्यान,’सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली. त्याचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याविरोधात बोलल्यास तुम्हाला बघून घेऊ, असे शिवसेनेच्या मुखपत्रात सांगितले जात आहे.  तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका. तसे असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी येतो, असे जाहीर आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  #पुणे पदवीधर: महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय

प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर  यांनी शिवसेना आणि  सामनावर टीका करत मुळात ‘सामना’ या सगळ्या प्रकरणात का भूमिका घेत आहे, तेच मला समजत नाही असे वक्तव्य केले. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याचे भाकीतही वर्तवले. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे. केंद्र व राज्यात अराजकीय मुद्द्यांवरुन राजकारण सुरु असले तर त्यावरुन फारसा परिणाम होत नाही. सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकार आपातकालीन व्यवस्थापन कायद्यातंर्गत आदेश काढत आहे.

केंद्र सरकारने नुकत्या मंजूर केलेले कृषी विधेयक राज्यात लागू करण्यास महाविकासआघाडी सरकारने विरोध दर्शविला आहे. ही एकप्रकारची बंडखोरी आहे. भारतीय घटनेने राज्याला अशाप्रकारे बंडखोरी करण्याचा अधिकार दिलेला नाही. केंद्र सरकारने एखादा कायदा मंजूर केल्यास राज्यांना त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्यामुळे राज्य सरकारने कृषी विधेयक लागू न केल्यास घटनेच्या  कलम 356 अंतर्गत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love