पुणे : भारतातील अलार्ड विद्यापीठ पुणे आपल्या प्रणालीसह विविध क्षेत्रात अनेक नवीन प्रोग्रॅम सुरू करत आहे. याच अनुषंगाने आता पुण्यात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू होणार्या सत्रात अलार्ड युनिव्हर्सिटी पुणे विद्यार्थ्यांच्या भवितत्व लक्षात घेऊन पदवी, पदव्युत्तर, आणि पी.एच.डी. विविध विषयांचे नवीन आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची सुरूवात करत आहोत. ‘आम्ही अलार्ड आहोत, आम्ही वेगळे आहोत’ या तत्त्वज्ञानासह अलार्ड विद्यापीठ पुणे आता मनोवृत्ती, नेतृत्व, दक्षता, तत्परता आणि समर्पण या पाच स्तंभांवर आधारित शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देईल. येथे, ७० टक्के व्यावहारिक आणि ३० टक्के थेरॉटीकल शिक्षण असेल तसेच विद्यार्थ्यांना १०० टक्के इंटर्नशिपची हमी मिळेल. अशी माहिती विद्यापीठ संस्थापक आणि कुलाधिपती डॉ.एल.आर. यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथे प्रवेश मिळविण्यासाठी, अलार्ड प्रवेश परीक्षेत उच्च गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांनाच अलार्ड विद्यापीठ शिष्यवृत्ती २०२४-२५ ही भेट मिळेल. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना १००, ७५, ५० आणि २५ टक्के शिष्यवृत्ती मिळेल. येथे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ऑनलाइन अलार्ड प्रवेश परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा भाषेवर नाही तर बुद्धिमत्तेवर आधारित असेल, असे त्यांनी सांगितले.
डॉ.एल.आर. यादव पुढे म्हणाले की, देशसेवा आणि समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी कार्य केले अशा पालकांच्या पाल्यांना विविध शिष्यवृत्ती देण्यात येईल. रक्षा शिष्यवृत्ती: सेवा पदक विजेत्यांना ५० टक्के, शौर्य पदक विजेत्यांना १०० टक्के, कोणत्याही संरक्षण सेवा पुरस्कारासाठी १५ टक्के, कर्तव्य निभावतांना जीवनाच्या बलिदानासाठी १०० टक्के,
क्रीडा शिष्यवृत्ती (सरकारद्वारे मान्यताप्राप्त): आंतरराष्ट्रीय पदक विजेते १०० टक्के, राष्ट्रीय पदक विजेते ७५, राज्य पदक विजेते ५०, जिल्हा पदक विजेते १५ टक्के.
धन्यवाद शिष्यवृत्तीः अलार्ड ग्रुप कर्मचारी ५० टक्के, अॅलार्ड ग्रुपचे माजी कर्मचारी २५, सध्याचे विद्यार्थी भावंडे २५, माजी विद्यार्थी ५०, माजी विद्यार्थी विस्तारित कुटुंब २५ टक्के.
२५ टक्के शिष्यवृत्ती सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना, २५ टक्के स्वातंत्र्य सैनिक कुटुंबांना आणि अनाथ मुलांना ५० टक्के शिष्यवृत्ती दिली जाईल.