आम्हाला आता भारतीय प्रशिक्षकही निर्माण करायचे आहेत-किरेन रिजीजू

क्रीडा
Spread the love

पुणे- सरकारने देशातील क्रीडा विषयक ध्येय धोरणांमध्ये अनेक बदल केले आहेत. प्रशिक्षणासाठी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जात आहेत किंवा त्यासाठी त्यांना अर्थसहाय्य दिले जात आहे. पण, आम्हाला आता भारतीय प्रशिक्षकही निर्माण करायचे आहेत. एक वेळ अशी यावी की खेळाडूंनी परदेशी नव्हे तर भारतीय प्रशिक्षकांना प्राधान्य द्यायला हवे अशी अपेक्षा केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी व्यक्त केली.

क्रीडा प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पुण्यातील इंडिया खेलेगा या क्रीडा संस्थेच्या स्पोर्टस् इन्किलाब प्रोजेक्टच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाट ) केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते झाले. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने टाकलेला चेंडू रिजिजू यांनी उपस्थितांमध्ये टोलवून दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन केले. इंडिया खेलेगा या संस्थेला गती मिळून ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू या संस्थेतून निर्माण व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

रिजिजू म्हणाले, सरकारने नेहमीच खेळाडूंची काळजी घेतली आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडो सरकार काळजीपूर्वक बघत असते, असे सांगून रिजीजू म्हणाले,’आतापर्यंत आपल्याकडे खेळाडूच्या आहाराविषयी फारसे लक्ष गांभीर्याने बघितले जात नव्हते. पण, या वेळी ही सरकारी चौकट मोडून मी खेळाडूंच्या आहारात तज्ज्ञांनुसार बदल करण्याचे आणि त्यांना परिपूर्ण आहार मिळावा असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर केवळ खेळ हे खेळापुरते मर्यादित न राहता देशाच्या आर्थिक विकासात या क्षेत्राचा वाटा असायला हवा. क्रीडा क्षेत्रही उद्योग क्षेत्र ठरू शकते. त्यानुसार माझे आता काम चालू असून, देशातील व्यावसायिकांनी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मला वाटते.’

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *