चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥
बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु।॥
खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२॥
तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवे
धेनु त्वां कामधेनु । सर्व पापं विनाशिनी ।
मोक्षफल दायीनीच । मातृदेवी नमोस्तुते ॥
वेद व पुराणकाळापासून गायीला विश्वाची माता म्हणतात गो विश्वस्य मातरम्…
जगतगुरू तुकाराम महाराज अभंगाद्वारे सांगतात की भगवान श्रीकृष्ण गोपाळांसमवेत गाई राखतात त्याप्रमाणे आपणही गायींचं पालन पोषण केलं पाहीजे। कारण भारत हा ९५ टक्के शेतीप्रधान देश आहे. येथील शेती अतीशय समृध्द आहे या शेतीचा मुळ आधार गाय आहे.संत ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात किंबहुना कृषी जिणे । करूनी गोरक्षणे । का समगीची विकने महर्गी वस्तु। देशी गाईचे दुध आईच्या दुधाप्रमाणे अमृत आहे. देशी गाईच्या शरीरापासून मिळणाऱ्या सर्व वस्तु औषधी आहेत. गोमुत्रात धन्वंतरी तर शेणात लक्ष्मी असते. देशीगाय प्राणी नसून प्राण आहे.गायी पासून नेहमी ऑक्सिजन बाहेर पडतो म्हणून तिच्या सानिध्यात असाध्य आजार बरे होतात. नपुंसकत्व असलेल्यांनी गाईची सेवा करावी. राजा दशरथाला अपत्य नव्हते म्हणून त्यांनी गोसेवा केली त्यांना मुले झाली.ज्यांना डिप़ेशन आहे,शक्ती कमी असणाऱ्यांनी गाईचे दररोज दर्शन घ्यावे. संकरीत गायींचे दूध विष आहे. संकरीत गायींच्या दूधामुळे शरीरातील इंद़ियांच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो तर देशी गायीच्या दूधामुळे प्रतिकारक्षमता वाढते आणि सर्व इंद्रिय कार्यक्षम होतात. संकरित गाय भरपूर दूध देणाया म्हणून स्वस्त आहे पण संकरित गायींच्या दूधामुळे शरीर जर्जर व रोगग़स्त होतं तर देशी गायीच्या दूधामुळे प़तिकारक्षमता वाढल्याने शरीर मजबूत आणि व्याधीमुक्त होते. आज अनेक गर्भश्रीमंत कारखानदार, नटनट्या, उदयोगपती स्वत:च्या शरीरस्वास्थासाठीएक हजार रुपये प्रति लिटर भावाने देशी गायीचे दुध आणि आठ – दहा हजार रुपये किलो दराने तूप घेऊन खात आहेत.त्यांच्यासाठी खास देशी गायीचे गोठे तयार केले आहेत.
गाईसी देखोनी बदबदा मारी । घोडयाची चाकरी गोड लागे तु.म.
गाईचे पाळण नयेची विचारा । अश्वासी खरारा करी अंगे तु.म.
देशात गोवंशाची बेसुमार कत्तल झाली १८२० साली गाईंच्या कत्तलीसाठी पहिला कत्तल कारखाना कलकत्त्याला सुरू झाला. देश स्वतंत्र झाल्यावर सुध्दा कत्तली चालूच राहील्या. गोमासाचे (मीट) महत्व परदेशात वाढत गेले. यामुळे गेल्या २०० वर्षानंतर फक्त एक टक्का देशी गाय देशात शिल्लक आहे. हे एक आंतरराष्टीय षडयंत्र होतं व त्याला आमच्या राज्यकर्त्यांनी नंतर मोठ्या प़माणात सहकार्य केलं आहे. भारतीय गीरा (काठीयवाडी) गाय ब्राझीलमध्ये नेली इथल्या वळूंना त्यांनी नेलं आणि संशोधन करून ६४ लिटर दूध देणारी गाय तयार केली।गीर लाल,सिंधी,साहिवाल, कांकरेज या भरपुर दूध देणाया गायींची पैदास राज्यकर्त्यांनी वाढवली नाही . उलट संकरीत गाईंचं विषारी दूध पाजून परदेशी ॲलोपॅथी औषधांसाठी बाजारपेठ तयार करण्यासाठी या देशातील लोकांचे शरीर व्याधीग़स्त कसे होईल याची व्यवस्था केली.मूळ भारतातून नष्ट, नामशेष झालेली ब्राह्मण ही देशी गायींची जात फक्त अमेरीकेत आहे. या गायींची करोडो रूपये किंमत मोजून ऑस्टेलिया, मलेशिया देश विकत घेत आहेत. परदेशातील शास्त्रज्ञांनी प्रत्येक प्रकारची गाय व वळूंना नेले. संसोधन करून गाय पैदास केली।उत्तम प़कारचे दूध मिळंवल आणी आमच्या राज्यकर्त्यांनी विषारी दूधाच्या जर्सी, होस्टन सारख्या विषारी दूधाच्या गायींची पैदास करण्याचं कारस्थान करून आपल्याच जनतेला व्याधीग़स्त केले आहे.जगात कोणत्याही गायीला वशिंड नाही फक्त भारतीय गायींना ‘वशिंडात’ सूर्य किरणातील काही उपयुक्त किरण शोषून घेण्याची क्षमता आहे या उपयुक्त किरणांमुळे गायींच्या जीन्स मध्ये प़ाकृत शारीरीक प़तिकारक्षमता तयार होते.ती क्षमता दुधात उतरते आणि असे पौष्टिक दूध मानवाला मिळते. यामुळं पूर्वीच्या माणसांचं आयुष्यमान उत्तम होत.गाय दूध व्यायल्यावर फक्त काही काळ देते.पण शेण आणी गोमुत्र कायम मिळणारा मुख्य पदार्थ आहे गायीच्या शेणात व मुत्रात जीवाणू वनस्पतींना वाढीसाठी असणारे सेंद़िय खत जमिनीत तयार करतात. त्यामुळे विषमुक्त अन्न निर्माण होते.गोमुत्रापासुन ४८ रोग बरे होतात.उदा. बवासीर, भगंदर, मुळव्याध, अर्थराईटिस, सांधे दुखी, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक,कॅन्सर कमी करण्यासाठी अर्धाकप दूध प्यावे.गोमुत्र हे आयुर्वेदिक औषधात उपयुक्त आहे. आयुर्वेदिक गुटी वटी गोळयांना केवळ गोमुत्राची भावना दिल्याने, गोळयांना लावल्याने गोळयांची क्षमता अनेक पटीने वाढते.गोमुत्र शिंपडल्याने घातक जंतू, विषाणू नष्ट होतात. तसेच घातक किरणोत्सारापासुन रक्षण होते याची अनुभूती अणुशक्तीकेंद़ दुर्घटनेत काहींनी घेतली आहे.सध्या देशात फक्त एक टक्कच देशी गाय शिल्लक आहे ही खुप खेदजनक बाब आहे गोमातेचे रक्षण करणे हे प़त्येक हिंदू बांधवांचे आदय कर्तव्य आहे.
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगता गोधनें राखिताहे ॥
म्हणून जगतगुरू तुकाराम महाराजांनी गाईंंना ‘गो’ धन म्हटल आहे।
वर्णा भिन्न दुधा नाही । सकळा गाईं सारखें ॥ तु।म।
विठ्ठल महाराज फड, चंदगड
🚩( लेखक गोसंवर्धक असून कीर्तन – प्रवचानाच्या माध्यमातून समाजजागृती करतात. धर्माचार्य सहप्रमुख कोल्हापूर जिल्हा आहेत. )