ओशो आश्रमाचे दोन भूखंड विक्रीला: प्रथितयश उद्योगपतीची 107 कोटींची बोली.. कोण आहेत हे उद्योगपती?


पुणे—पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागात असलेल्या ओशो आश्रमावरही कोरोनाच्या संकटामुळे भूखंड विकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, विकण्यासाठी काढलेल्या दोन भूखंडाला एकशे सात कोटी रुपयांची बोली एका प्रथितयश उद्योगपतीने लावली असल्याच्या चर्चेला उधाण आले असून एवढ्या मोठ्या बोलीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान भूखंड विक्री म्हणजे ओशो आश्रम बंद करण्याचं एक मोठं षडयंत्र असल्याचं सांगत ओशो यांच्या भक्तांनी या भूंखड विक्रिला विरोध केला आहे.

पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे रजनीश उर्फ ओशो यांचा 18 एकर परिसरात आश्रम आहे. झुरिच मधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन यांची मालकी असलेला हा आश्रम जगभरातल्या लोकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. देश-विदेशातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात.कोरोनामुळे आश्रम आर्थिक अडचणीत आल्यामुळे भूखंड विकायचा निर्णय घेतल्याचा दावा ओशो आश्रमाच्यावतीने करण्यात आला आहे.

अधिक वाचा  पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक बंद

याच केंद्रांमधील दोन मोठे भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले आहेत. यासाठी परवानगी मिळावी म्हणून ऊन इंटरनॅशनलच्यावतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज करण्यात आला आहे. या भूखंडासाठी तीन मोठ्या उद्योगपतींकडून बोली लावण्यात आली होती.

या जागेशेजारी ज्यांचा बंगला आहे त्या राजीव बजाज यांनी सर्वाधिक तब्बल एकशे सात कोटींना हे भूखंड विकत घेण्याची तयारी बजाज यांनी दाखवलीय. दरम्यान भूखंड विक्री म्हणजे ओशो आश्रम बंद करण्याचं एक मोठं षडयंत्र असल्याचं सांगत ओशो यांच्या भक्तांनी या भूंखड विक्रिला विरोध दर्शवलाय. भक्तांचा विरोध पाहता हा व्यवहार होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love