ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्ट – चंद्रकांत पाटील


पुणे -ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या दृष्टीने ट्रस्ट स्थापन करण्याचे चे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ह्या माध्यमातून गरजूना मदत दिली जाईल अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक च्या पुणे केंद्राच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे केंद्र प्रमुख मकरंद माणकीकर,भाजप चे प्रवक्ते व संस्थेचे मार्गदर्शक संदीप खर्डेकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव ,उल्हास पाठक,शिरीष आठल्ये,माधव ताटके,सुवर्णा  रिसबूड,पल्लवी गाडगीळ,अनंत खेडलेकर ई पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. माणकीकर यांनी समाज सहाय्यक संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, त्यावेळी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ह्या ट्रस्ट साठी कायमस्वरूपी निधी संकलन करून त्यातील व्याजाच्या उत्पन्नाचा समाजहितासाठी विनियोग करता येईल, असे सांगतानाच मी ह्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देतो असेही चंद्रकांतदादा यांनी जाहीर केले.तसेच पुरोहितांनी ई श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी करावी, त्याचा दीर्घकालीन लाभ होईल असेही आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Governor Ramesh Bais : भारताच्या परिवर्तनात युवा पिढीची महत्वाची भूमिका - राज्यपाल रमेश बैस