कोरोनावरील पहिले ‘टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज’ औषध किती दिवस? कसे? आणि कोण घेऊ शकणार?


गोरखपुर –कोविडवर देशातील ‘टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज  2-deoxy-D-glucose drug या पहिल्या औषधाचा शोध लावणारे डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन आणि स्ट्रेंथ सायन्सेस Nuclear Medicine and Strength Sciences या संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक असलेले डॉ. अनंत नारायण भट्ट यांनी हे औषध प्रत्येक घटकाला उपयोगी असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या औषधाची किंमत सामान्य असणार असून जसे उत्पादन वाढेल तशी किंमत आणखी कमी होईल असे म्हटले आहे. त्यामुळे कोरोना संकटाने ग्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला असून या महामारीपासून बचाव होण्यासाठी आशेची किरणे निर्माण झाली आहेत.  

जास्तीत जास्त एक आठवडा घ्यावे लागणार हे औषध

डीआरडीओ वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे कोविडवरचे औषध पाण्यात मिसळणारे आहे. अर्ध्या किंवा एका ग्लास पाण्यात औषध मिसळून  जेवणापूर्वी सकाळ -संध्याकाळ त्याचे सेवन करायचे आहे. हे औषध जास्तीत जास्त सात दिवस सेवन करावे लागेल असे सांगतानाच जर तुम्हाला तीन ते चार दिवसांत बरे वाटले तर औषध खाण्याचीही गरज भासणार नाही असा दावा भट्ट यांनी केला आहे.

अधिक वाचा  भारत हा जगात प्रथम क्रमांकाचा शस्त्र निर्यातदार देश बनेल

मुलांनाही देता येणार

डॉ. भट्ट यांच्या म्हणण्यानुसार, डीजीसीआयने औषधाचा नियमित वापर करण्यास मान्यता मिळताच मुलांनाही या औषधाचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाऊ शकते. या औषधाची वैज्ञानिक ​​चाचणी 18 वर्षांवरील लोकांवर जरी केली गेली असली तरी हे औषध मुलांसाठी हानिकारक नाही. मुलांनाही हे औषध देता येईल असे भट्ट यांनी महटले आहे.

तरूण आणि वृद्धांवर देखील तितकेच प्रभावी

डॉ. अनंत भट्ट यांच्या म्हणण्यानुसार, कोविड मेडिसिन तरुणांप्रमाणेच वृद्धांनाही दिलासा देईल.  कोरोना संसर्गग्रस्तांना हेऔषध देण्यात आले होते, त्यापैकी 42% लोकांना तीन ते चार दिवसांत आराम मिळाला. यात तरूण, वृद्ध रुग्णांचा समावेश होता.  हे औषध घेतल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची त्यांची समस्येपासून सुटका तर झालीच परंतु त्यांचा ताप आणि खोकलाही कमी झाला.

अधिक वाचा  राजस्थानात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होणार?सचिन पायलट आमदारांसह दिल्लीत दाखल

औषध विषाणूचे गुणाकार प्रतिबंधित करते

डॉ. अनंत यांच्या म्हणण्यानुसार, कोविड औषध विषाणूचे परिणाम कमी करते. औषध विषाणूमुळे प्रभावित झालेल्या पेशींमध्ये जाऊन व्हायरसचे गुणाकार थांबवते. खराब झालेल्या पेशींना संरक्षण प्रदान करते.

औषधांचे नाव बदलणार?

कोविड औषधाचे रासायनिक नाव टू डी-ऑक्सी डी ग्लूकोज हे आहे. हैदराबादच्या डॉ.  रेड्डीज लॅबच्या सहकार्याने हे औषध विकसित केले गेले आहे. त्यामुळे बाजारात येण्यापूर्वी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी कदाचित औषधाचे नाव बदलूही शकते असे डॉ. भट्ट यांनी महटले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love