पश्चातबुद्धीने सुचलेले शहाणपण – गोपाळदादा तिवारी यांची टीका

सत्ता जाणार या धास्तीने भाजप शिर्ष नेतृत्वास मराठी भाषा आठवली
सत्ता जाणार या धास्तीने भाजप शिर्ष नेतृत्वास मराठी भाषा आठवली

पुणे -कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “वाढत्या जनक्षोभामुळे, व मनाची लाज बाळगून केली असुन, विविध स्तरीय वाढत्या विरोधामुळेच ‘पश्चातबुघ्दीने सुचलेले शहाणपण’ असल्याचा हल्वाबोल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. 

संविधान लोकशाही प्रेमी संस्था, विद्यार्थी, कामगार संघटना व ‘इंडीया घटक पक्षांनी’ सरकारी पदांची भरती, पोलीस भरती बाबतच्या खाजगी करणाच्या निर्णया विरोधात आवाज उठवला व संघर्ष केला त्यांचा हा विजय असुन तरुणांच्यातील असंतोषाचा अंदाज आल्यानेच शासनाने हा जीआर मागे घेतला हा जागरुक लोकशाहीचा विजय असल्याचे काँग्रेस ने म्हटले आहे.

या खाजगी कंत्राटीकरणा विषयी काँग्रेस चे शिष्टमंडळाने राज्यपाल महेदयांना लेखी हरकतीचे निवेदन दिले होते, याचे स्मरण ही काँग्रेस प्रवक्ते तिवारी यांनी दिले. खरेतर या विषयी पुन्हा कोर्टाकडुन ताशेरे ऐकुन घेण्याची नामुष्की भाजप वर येऊ शकते, ही भिती देखील फडणवीसांना होती. 

अधिक वाचा  लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा : एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा : योजनेचा थाटात शुभारंभ

  ‘सरकारी पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा ‘जीआर’ रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना, फडणवीस यांनी मविआ सरकारवर खापर फोडण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला असुन, बालीश आरोप केले असल्याचेही  प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हंटले आहे.

‘मर्यादीत काळाच्या सेवा व कामांसाठी, प्रासंगिक स्वरुपात कंत्राटी पध्दतीचा’ आधार विशेष प्रसंगात घेणे व  ‘कायमस्वरुपी सरकारी पदे, स्थानिक संस्थामधील पदे, पोलीस कर्मचारी भरणे’ या मधील ‘मुलभूत धोरणात्मक फरक’ ही फडणवीस व भाजप नेत्यांना कळुनये ही त्यांची बौध्दीक दिवाळखोरी असल्याची प्रखर टिका देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी फडणवीसांचे तथ्यहीन आरोपांवर केली. 

एकीकडे मविआ वर आरोप करायचे मात्र दुसरीकडे, कंत्राटी पध्दतीने काम करीत असलेल्या (१६० + ७५) अशा सु २३५ ठरावीक कामगारांनाच शैक्षणिक अहर्ता व नियम डावलून पुणे मनपा’त भ्रष्टाचारी मार्गाने कायमस्वरुपी करण्याचे षडयंत्र करायचे’ ही कुठली भाजप ची दोगली निती या आरोप प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील काँग्रेस करत असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. 

अधिक वाचा  पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड

फडणवीसांचे आरोपा नुसार, जर मविआ सरकारचं पाप होते  तर ते अनौरस त्रिकुट सरकारनं इतके दिवस ते डोक्यावर का ठेवलं होतं?

पुर्वीच्या जीआर मधे सुधारणा करुन व कंत्राटीकरणाच्या कक्षेतील कायमस्वरुपी सरकारी पदांची व्याप्ती वाढवून त्यात तहसीलदार, पोलीस आदी महत्वाच्या पदांची भर घालुन” ते कंत्राटीकरण भरतीचे पाप डोक्यावर का घेतलं होत?या प्रश्नांची ऊत्तरे फडणवीसांनी प्रथम द्यावीत व मगच पुर्वीच्या सरकारवर बिनबुडाचे आरोप करावेत.. असे ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love