राज्याला कोरोना लशीचे १९.५ लाख डोस मिळणार : खा. गिरीश बापट


नवी दिल्ली-  कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. खा.बापट यांनी नवी दिल्ली येथे आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्राला कोविड लसीचे सुमारे साडे एकोणीस लाख डोस दिले जातील,असे आश्वासन हर्षवर्धन यांनी दिले असल्याच माहितीही बापट यांनी दिली ते पत्रकारांशी बोलत होते.

बापट म्हणाले, आज (8 एप्रिल )रोजी पुणे जिल्ह्यात सुमारे साडेदहा हजार कोविडचे रुग्ण सापडले. ही संख्या चिंताजनक असून महाराष्ट्रातील आजची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रतिबंधक लस देण्याची मोहीम अधिक गतिमान करावी तसेच रुग्णालयातील बेडसची संख्या वाढवण्यासाठी मदत करावी,असे निवेदन आज मी केन्द्रीय आरोग्य मंत्री यांना दिले.

अधिक वाचा  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचा पहिला तक्रार अर्ज दाखल: संजय राठोडांच्या अडचणी वाढणार

पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिक लस टोचून घेतात. तथापि शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख वायल्स इतकी लस गरजेची आहे. लशीचा पुरवठा कमी झाल्याने. या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी. अशी आमची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे.शहरातील अशा २१५ खाजगी रुग्णालयात लसीकरण करता येईल. त्या रुग्णालयाची यादीही आम्ही सादर केली आहे. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी मोबाईल लसीकरण व्हॅन सुरू करण्याची परवानगी पुणे महापालिकेला देण्यात यावी. याकडे मी आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले .कोविड लसीकरणाकरिता खाजगी रूग्णालयांना परवानगी मिळवणे ही प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट आहे. ती सुलभ करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे.तसेच व्हेंटीलेटरची संख्या वाढवावी यासाठी  केन्द्राकडे आग्रह धरला असल्याचे बापट यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love