राज्य सरकारचा उर्वरित अहंकार विधानसभा निवडणुकीत खाली आणला जाईल- रोहित पवार

राज्य सरकारचा उर्वरित अहंकार विधानसभा निवडणुकीत खाली आणला जाईल
राज्य सरकारचा उर्वरित अहंकार विधानसभा निवडणुकीत खाली आणला जाईल

पुणे(प्रतिनिधि)–मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान अतोनात झाले. सरकारने याबाबत लवकर लक्ष घालून पंचनामे करावे. पण सरकारला संबधित फाईलवर सही करण्यास वेळ नसून ते वेगळ्याच यात्रेत व्यस्त आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारचा अहंकार नागरिकांनी धुळीस मिळवला असून उर्वरित अहंकार विधानसभा निवडणुकीत खाली आणला जाईल, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

मागील वर्षी विमा कंपनीकडून वेळेवर विमा शेतकर्‍यांना मिळाला नाही. राज्यातील नाशिक, चंद्रपुर, सातारा यांसह ६ जिल्ह्यांत ११० टक्के नुकसान झाले असून साडेअठराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या प्रकरणांच्या फाईलवर सत्ताधार्‍यांना सही करायला ही वेळ मिळत नाही ही राज्यासाठी मोठी शोकांतिका आहे. सरकारने शेतकर्‍यांची तरी पिळवणुक करु नये, असी अपेक्षाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

अधिक वाचा  वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना महाडमधून अटक : मनोरमाची झाली इंदुमती, पण पोलिसांनी शोधलंच...

दैनंदिन प्रवासाचे सर्वसामान्यांचे एसटी साधन असून एसटी कर्मचारी यांच्या मागण्या सरकार एकूण घेत नाही त्यांना केवळ सत्तेच्या खुर्चीत रस आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बंदिस्त करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. महविकास आघाडीची मते खाण्यासाठी तिसरी आघाडी निर्माण केली जात आहे हे आगामी काळात दिसून येईल. पक्ष म्हणून एकत्रित लढून टिकता येणार नाही असे केंद्रामधील नेत्यांना वाटत असल्याने ते मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांना पुढे करून वेगळे लढण्यासाठी सांगत असेल. दिल्ली मधून आदेश आले की त्यांना ते पाळावे लागतात अशी टिकाही पवार यांनी यावेळी केली.

 हे सरकार गुंडाचे

अधिक वाचा  जगातील सर्वांत मोठा पुस्तक महोत्सव पुण्यात : चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

पवार म्हणाले, पुण्यात गुन्हेगारी वाढत असून पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन गुन्हेगार रील्स करतात. मंत्री गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे जाहीर सत्कार करतात. त्यामुळे जनतेत हे सरकार आपले नसून गुंडाचे आहे अशी भावना निर्माण झाली आहे. सरकारने मागील अडीच वर्षात 50 हजार कोटी पेक्षा अधिकचा घोटाळा केला आहे. सत्ताधारी भ्रष्टाचार करत असल्याने प्रशासन मधील लोक देखील त्यात सहभागी होत आहे हे दुर्देवी चित्र आहे.

फडणवीसांचे कुरघोडीचे राजकारण

देवेंद्र फडणवीस कुरघोडीचे राजकारण करत आहे. ते अनेक नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. फडणवीस भूमिका घेताना स्वतः घेत नाहीत, तर त्यांच्या वतीने चार ते पाच नेते बोलण्यास ठेवले आहे. शरद पवार यांच्यावर बेछूट आरोप करण्यात येत आहेत. हसन मुश्रीफ यांना सत्तेतील मलिदा खाण्यात रस आहे. त्यांना लोकांच्या समस्यांचे काही देणेघेणे नाही. आमच्या संपर्कात अनेक आमदार आहेत. पण शरद पवार यांनी सांगितले की, जे निष्ठावंत आहे त्यांना ताकद आगामी काळात द्यायची आहे. अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना धडा शिकवला जाणार आहे. याबाबत शरद पवार यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे.

अधिक वाचा  शरद पवार यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोलले पाहिजे- अजित पवारांचा फडणविसांना टोला

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love