Gopal Tiwari : धर्मशास्त्रानुसार, अर्धवट बांधलेल्या मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिर उद्घाटन अयोग्य असल्यानेच ‘चारही धामच्या’ शंकराचार्यांनी बहिष्कार टाकणे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट नाही, तर देशाची सभ्यता आणि संस्कृतीसाठी लाजिरवाणे आहे. केंद्रात बसलेले मोदी सरकार स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सत्तेच्या जोरावर दबाव आणून ‘मंदीर न्यास’च्या कामात अवाजवी हस्तक्षेप करीत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.(The Modi government is interfering excessively in the work of ‘Mandir Nyas’ by exerting pressure)
ते पुढे म्हणाले की, लोकशाही देशात मोदी विद्यमान भाजप सरकारचे जनतेप्रती ऊत्तरदायीत्वाचे १० वर्षांचे अपयश आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करणे, देशावरील कर्ज ३ पटीने वाढणे, बेरोजगारी व महागाईवर नियंत्रण न ठेवणे या सर्व बाबी आता ऊघड झाल्या आहेत.
त्यामुळे,जनतेचे लक्ष राजकीय अपयशावरून इतरत्र वळवण्यासाठी, निव्वळ निवडुका डोळ्यांसमोर ठेऊन (अर्धवट) मंदीराच्या ऊदधाटनाचा प्रपोगंडा केला जात आहे.
ते पुढे म्हणाले की, “संवैधानिक कर्तव्ये पार पाडत असतांना कोणत्याही धर्म, पंथ व संप्रदायात हस्तक्षेपा पासून काँग्रेस सतत दुर राहीली. राज्य घटनेची बांधीलकी पाळत आलेल्या धर्म निरपेक्ष काँग्रेस’ला हिंदूविरोधी(?) दाखवण्याचा ‘भाजपचा आरोप’ अतिशय हास्यास्पद आणि राजकीय बाल्यावस्था दाखवणारा आहे.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिराजींनी देशात टीव्ही आणला आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी (रामानंद सागर निर्मित) रामायण आणि महाभारत” मालिका 84 आणि 98 भागांमध्ये सलग दोन वर्षे (दर रविवारी स १० – ११ वेळेत) दाखवल्या..! तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राम मंदिराचा शिलान्सास ही केला. श्रीमती इंदिराजी सतत ‘रुद्राक्ष माळा’ धारण करायच्या व वेळोवेळी शंकराचार्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेत असत. त्या त्यांच्यासमोर खाली जमीनीवर बसायच्या व व्यक्तिगत हिदू धर्म संस्कार जोपासायच्या. पण काँग्रेसच्या पंतप्रधानांनी कधीही राजकीय हेतुने हिंदुत्वाचा देखावा केला नाही. उलट नेहमीच “संवैधानिक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता” स्वीकारून आपले कर्तव्य बजावले.
श्री रामजींचा ‘उत्साही जयजयकार’ हे केवळ हिंदुत्वाचे वैशिष्ट्य नाही, तर ‘राम चारित्राची शिकवणुक आणि सद्गुणांचे पालन करणे’ हे राम_चारित्र्याचे अनुकरण करण्याचा काँग्रेस पक्षाचा सातत्याने प्रयत्न आहे.
ते असेही म्हणाले की,काँग्रेसच्या घटनात्मक धर्मनिरपेक्षतेच्या वातावरणामुळेच् डॉ.ए.पी.जे.अबुल कलाम, मोहम्मद इस्लाम खान यांसारखे शास्त्रज्ञ, बिस्मिल्ला खान, झाकीर हुसेन, एम.एफ. हुसेन, आणि नवाब मन्सूर अली खान पतौडी यांसारखे कलाकार, गीतकार आणि संगीतकार नौशाद, मोहम्मद रफी, अमीन सयानी, जब्बार पटेल, वहिदा रहमान, कादर खान, सलमान, शाहरुख आणि आमिर खान, जावेद अख्तर आणि शबाना आझमीसारखे कलाकार, सईद किरमाणी, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद शमी (क्रिकेट), मोहम्मद शाहिद (हॉकी) सारखे खेळाडू लाभले. ज्यांनी भारताला वैभव मिळवून दिले आणि देशाच्या प्रगतीत योगदान दिले. ही गोष्टही महत्त्वाची आहे. अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करणे, त्यांना भारतीय नागरिक म्हणून संधी देणे, त्यांना योग्य न्याय देणे हे हिंदू धर्मात पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते सांगुन चालन नव्हे, अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.