धक्कादायक: कर्ज फेडण्यासाठी नातीनेच केला आजीचा खून

रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनींचा पाठलाग करत विनयभंग
रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनींचा पाठलाग करत विनयभंग

पुणे—लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीनेच आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील वारजे भागातील आकाशनगर येथे घडली आहे.लोनॲप वरुन घेतलेले कर्ज फेडण्यासाठी संबंधीत व्यक्तीला अनेकदा ब्लॅकमेल करून त्यांची बदनामी केली जाते आहे. त्यातूनच हा गंभीर प्रकार घडला असून नातीने आपल्या आजीचा खून केला.

सुलोचना सुभाष डांगे (वय.६५ ,रा.शुभम कॉलनी लेन क्रमांक दोन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी गौरी सुनील डांगे (वय.२४) या नातीला ताब्यात घेतले आहे. तर सुलोचना सुभाष डांगे (वय.६५ ,रा.शुभम कॉलनी लेन क्रमांक दोन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे येथील आकाशनगर परिसरात डांगे, त्यांचा मुलगा आणि नात राहतात. त्यांचा मुलगा सुतारकाम करतो आणि नात नोकरी करते. डांगे मंगळवारी एकट्या घरात होत्या. पाण्याची मोटार सुरू होत नसल्याने सायंकाळी सहाच्या सुमारास एक भाडेकरूने डांगे यांना हाक मारली. मात्र डांगे यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भाडेकरू त्यांच्या घरात गेला. तेव्हा डांगे फरशीवर पडल्याचे आढळून आले. भाडेकरूने डांगे यांच्या मुलाला याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली.

अधिक वाचा  मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज : पुढाकार घेण्याचे 'मसाप'चे शरद पवार यांना आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी हिने लोनॲपद्वारे कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी तिला वारंवार कंपनीकडून तगादा लावण्यात येत होता. त्यातूनच तिने मंगळवारी सकाळी आजीचा खून करून घरात चोरी झाल्याचा बनाव रचला. आजी घरात एकटी असताना उशीने तोंड दाबून तिचा गळा घोटला. त्यानंतर हातावर वार केले. आजीचे सोने घेऊन तिने घराबाहेर पळ काढला होता. तपासादरम्यान पोलिसांना मुलगा आणि नातीवर संशय होत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलिस उपनरीक्षक नरेंद्र मुंढे यांच्या पथकाने मुलीकडे पोलिसी खाक्या दाखवून तपास केला असता. नातीने आजीच्या खुनाची कबुली दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love