पुणे कॅम्प मधील नुकसानग्रस्तांना शासनाने 5 लाखाची तात्काळ मदत करावी – पदमश्री मिलिंद कांबळे


पुणे—पुण्याच्या पूर्व भागातील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीत 600च्या वर दुकाने जळून खाक झाली. या आगीत नुकसान झालेल्या कष्टकरी ,हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना शासनाने तात्काळ पाच लाखाची मदत जाहीर करावी अशी मागणी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पदमश्री मिलिंद कांबळे यांनी केली आहे. त्यांनी पुणे कॅम्प येथील जळीतग्रस्त व्यावसायिकांची भेट घेऊन त्या ठिकाणची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

पुढे ते म्हणाले की जिल्हाधिकारी,पुणे कँटोन्मेंट चे अधिकारी यांनी या ठिकाणची पाहणी करून तत्काळ सरसकट सुरुवातीला 5 लाखाची मदत करावी आणि त्यांनतर घटना घडल्याच्या ठिकाणचे सर्वेक्षण करावे.  कारण यामध्ये सर्व छोटे व्यावसायिक हे कष्ट करून येथे अतिशय प्रामाणिक पणे गेली 30 वर्षापासून व्यवसाय करीत आहेत.पुण्याचा वैभवात भर घालणारा असा फॅशन स्ट्रीट हा भाग आहे. अतिशय माफक दरात आणि अतिशय आधुनिक दर्जाचे कपडे,महिला युवक आणि सर्वच लोकांना सर्व प्रकारचे वस्तू साहित्य येथे मिळत होते. समाजातील अतिशय गरीब आणि उपेक्षित लोक असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण लवकरच पालकमंत्री अजित पवार ,खासदार गिरीश बापट , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

अधिक वाचा  अण्णा हजारेंचं मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा देणं ही बाब अनाकलनीय

यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी डिक्की चे अविनाश जगताप ,पुणे शहर अध्यक्ष अनिल होवाळे,एन.जी.खरात, मैत्रिय कांबळे यासह दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love