नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक : सुप्रिया सुळे

नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक
नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक

पुणे(प्रतिनिधी)–राज्यातील इतर पाणी योजना सुरू आहेत. त्यांच्यासाठी सरकारकडे पैसा आहे, आणि निरा-देवधरसाठी मात्र नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. ही योजना रद्द करण्याचा निर्णय या योजनेवर अवलंबून असणाऱया शेतकऱयांसाठी अन्यायकारक असून याविरोधात भविष्यात जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे दिला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून निधी नसेल, तर अन्य योजना कशा पूर्ण करणार आहात, याचे उत्तर द्यावे, असे म्हटले आहे.

राज्यातील कृष्णा-कोयना, म्हैशाळ-जत, सुलवाडे-जामफळ-कनोली, टेंभू, गोदावरी विकास महामंडळ औरंगाबाद, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव व विदर्भ विकास महामंडळ नागपूर या उपसा सिंचन योजना आणि विकास महामंडळांची कामे जर विनातक्रार सुरू असतील, तर केवळ निरा-देवधर योजनेलाच निधी का नाही, हा आपला प्रश्न आहे. शासनाने निरा देवधर योजनेच्या निविदेच्या मंजुरीचे काम बंद केले आहे. निधीअभावी हा प्रकल्प रद्द करत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. असे करणे योग्य नसून कृष्णा-कोयना-उपसा सिंचन योजना म्हैसाळ-जत व सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना, टेंभू उपसा सिंचन प्रकल्पा अंतर्गत विविध उपसा सिंचन योजना सांगली आणि सातारा जिह्यासह अन्य महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाकरीता जितक्मया महत्वाच्या आहेत, तितकीच निरा-देवधर योजनासुद्धा महत्वाची आहे, असे सुळे यांनी याबाबतच्या आपल्या पत्रात म्हटले आहे.

अधिक वाचा  कोणी कोणाचे ऐकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे- शरद पवार

निधी नाही या कारणाने निरा-देवधर योजना रद्द केल्यास भोर-फलटण- माळशिरस या परिसरातील हजारो शेतकऱयांना गंभीर पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे, ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली आहे. निधीअभावी पाणी योजना रद्द करायच्या झाल्यास अन्य योजनादेखील रद्द होणे क्रमप्राप्त ठरते. यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या हजारो शेतकऱयांवर अन्याय होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शेतकऱयांच्या फायद्याची कोणतीच योजना निधीअभावी रद्द करू नये अशीच आमची भूमीका आहे. परंतु निधीअभावी जर निरा देवधर प्रकल्प बंद करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असेल, तर ते योग्य नाही, असेही सुळे यांनी ठणकावले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love