मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

पुणे—सर्वोच्च नायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारने कायदेशीर बाबींचा अभ्यास करून प्रयत्न करावेत या आणि इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती  मोर्चाच्या वतीने आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून कार्यालयाला घेराव घालण्यात आला. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण राज्यात विविध मार्गाने […]

Read More

Moratorium : कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मिळणार दोन वर्षांची सूट?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)– मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली आहे. ही माहिती देताना केंद्र सरकारकडून आरबीआयच्या सर्क्युलरचा दाखला दिला. मोरॅटोरियम कालावधीतील हप्त्यांवरील व्याज आकारणीच्या प्रश्नावर बोलताना सरकारने केंद्र, आरबीआय आणि बँकिंग असोसिएनशला बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाला सांगितलं. […]

Read More

उदय सामंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा -चंद्रकांत पाटील

पुणे– पदवीच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने  शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारला या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. अधिकार नसताना राज्यात परीक्षा रद्द करण्याचा चुकीचा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळले असून विद्यार्थ्यांना झालेल्या भयानक मानसिक त्रासाबद्दल उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी […]

Read More

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

मुंबई- कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) मात्र, परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यावरून युजीसी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावरून राज्यात राजकारणही पेटले आणि आरोप-प्रत्यारोप सुद्धा झाले. परीक्षा घ्याव्यात आणि नाही घ्याव्यात याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या. […]

Read More