त्यांनी ‘इडी’ लावली तर मी ‘सीडी’ लावेन: कोणाला म्हणाले खडसे असे?

मुंबई—खान्देशातील भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. आपल्या डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखे वाटतं असे सांगतानाच त्यांनी ‘इडी’ लावली तर मी ‘सीडी’ लावेन असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केले. कोणी किती भूखंड घेतले? यांचे लवकरच पत्ते खोलणार असल्याचे ते म्हणाले. […]

Read More

जलयुक्त शिवारची जरूर चौकशी करावी- देवेंद्र फडणवीस

उस्मानाबाद _ “जलयुक्त शिवारची चौकशी जरूर करावी. यातील कोणतेच काम मंत्रालयातून मंजूर झालेले नाही. स्थानिक स्तरावर कामांच्या मंजुरीचे अधिकार देण्यात आले होते. सुमारे ६ लाखांवर कामे झाली असून, त्यात आलेल्या 700 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने नक्की चौकशी करावी”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]

Read More

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काहीतरी टोकन रक्कम मदत म्हणून जाहीर करावी -चंद्रकांत पाटील

पुणे- मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात इतरांसारखा प्रवास करून उपयोग होणार नाही. त्या प्रवासामध्ये त्यांनी काहीतरी ठोस घोषणा करायला हवी. तसं न करता मुख्यमंत्री अजूनही अतिवृष्टी होऊ शकते, मी जरा पाहतो असे आश्वासन देत आहेत. पण, आता जे झालं त्याचाबद्दल बोला ना, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. मुख्यमंत्री महणून […]

Read More

राज्य सरकारचा बचाव करण्याचे एकमेव काम शरद पवार करीत आहेत- देवेंद्र फडणवीस

पुणे —राज्य शासनाचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचे एकमेव काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केवळ टोलवाटोलवी करू नका अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्ट करावे असेही ते म्हणाले. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी बारामती तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या […]

Read More

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

पुणे—भाजप- शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिल्यानंतर त्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. ‘कॅग’ च्या अहवालामध्ये ही योजना अपयशी ठरली आहे. या योजनेवर 9634 कोटी रुपये खर्चूनही पाण्याची गरज भागवण्यात व भूजल पातळी वाढविण्यात अपयश आले आहे असे म्हटले आहे. […]

Read More

नाथाभाऊंंचं अखेर ठरलं : राष्ट्रवादीकडून मिळणार मंत्रीपद?

मुंबई- भाजपचे नाराज नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे पक्षांतर जवळ- जवळ निश्चित आले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना कृषी खाते देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष आणि पक्षाच्या राज्यातील नेत्यांवर नाराज असलेल्या खडसे यांच्या या भूमिकेमुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे. खडसे हे पक्ष सोडणार, ते राष्ट्रवादीत जाणार, […]

Read More